३१ लाख २० हजार विद्यार्थी परीक्षेविना पुढच्या वर्गात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:12 AM2021-04-09T04:12:33+5:302021-04-09T04:12:33+5:30

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना परीक्षाविना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतल्यानंतर नववी व अकरावीच्या ...

31 lakh 20 thousand students in the next class without examination | ३१ लाख २० हजार विद्यार्थी परीक्षेविना पुढच्या वर्गात

३१ लाख २० हजार विद्यार्थी परीक्षेविना पुढच्या वर्गात

Next

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना परीक्षाविना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतल्यानंतर नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा परीक्षा न घेता थेट पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा राज्यातील सुमारे ३१ लाख २० हजार विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.त्यामुळे पुढील वर्षी दहावी-बारावीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक असणार आहे.

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना नापास करता येत नाही. तसेच नववीमध्ये सुद्धा एखादा विद्यार्थी अनुत्तीर्ण होत असल्यास त्याची पुन्हा परीक्षा घेता येते. परंतु, अनेक शाळा दहावीचा निकाल चांगला लागावा, यासाठी अभ्यासक्रमात मागे असलेल्या विद्यार्थ्यांना नापास करत असल्याचे दिसून आले आहे. अकरावीला सुद्धा नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. परंतु, राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे यावर्षी सर्वच विद्यार्थी थेट दहावी व बारावीत प्रवेश होऊ शकतात.

मराठा आरक्षणाच्या निर्णयामुळे यंदा अकरावीची प्रवेश प्रक्रिया उशिरा सुरू झाली. मागील आठवड्यापर्यंत अकरावीचे व प्रवेश सुरू होते. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा अकरावीचा फारचचा अभ्यासक्रम शिकवून झालेला नाही. मात्र, नववीमध्ये दहावीच्या अभ्यासक्रमासाठी पूरक असणाऱ्या संकल्पना विद्यार्थ्यांना स्पष्ट होणे गरजेचे आहे. तसेच अकरावीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा बारावीत जाण्यापूर्वी विज्ञान व वाणिज्य विषयातील काही संकल्पनांची माहिती होणे आवश्यक असते. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या जाणार नसल्या तरी त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करणे महत्त्वाचे आहे, असे शिक्षण तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.

—---

राज्यातील सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये २०१९-२०२० या शैक्षणिक वर्षात नववीच्या १७ लाख ९७ हजार ६५५ तर अकरावीच्या १३ लाख २२ हजार ३८६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. २०२०-२०२१ या शैक्षणिक वर्षातही साधारणपणे एवढ्याच विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असण्याची शक्यता आहे त्यामुळे राज्यातील तब्बल ३१ लाख २० हजार ४१ विद्यार्थी थेट दहावी व बारावीच्या वर्गात गेले आहेत.

—----

राज्यातील प्रमुख शहरांमधील नववी व अकरावीसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या आकडेवरी (वर्ष- २०१९-२०२०)

जिल्हा नववी अकरावी

मुंबई १,४०,८७० १,३८,६८७

पुणे १,४६,२२९ १,१६,२७३

नाशिक १,०७,००० ६६,७६९

ठाणे १,२९,८७५ ८६,८२९

औरंगाबाद ७२,०१३ ५४,५४०

नागपूर ६५,३०० ५५,८७६

अहमदनगर ७८,४८५ ६२,८८८

जळगाव ७३,७०३ ४४,४१६

Web Title: 31 lakh 20 thousand students in the next class without examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.