बारामतीतून ३२ उमेदवार रिंगणात, रंजना कुल यांचा डमी अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 11:14 PM2019-04-04T23:14:26+5:302019-04-04T23:15:03+5:30

बारामतीतून अर्ज भरलेल्या उमेदवारांची नावे

32 candidates from Baramati, Dummy application of Ranjana Kul's nomination | बारामतीतून ३२ उमेदवार रिंगणात, रंजना कुल यांचा डमी अर्ज

बारामतीतून ३२ उमेदवार रिंगणात, रंजना कुल यांचा डमी अर्ज

Next

पुणे : बारामती लोकसभा मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली असून बारामतीतून 32 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यात 18 अर्ज विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी दाखल केले असून अपक्ष उमेदवारांनी 14 अर्ज दाखल केले आहेत.

तसेच भारतीय जनता पक्षातर्फे कांचन कुल व रंजना कुल या दोघींनी अर्ज भरले आहेत. बारामती लोकसभा मतदार संघातून निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास 28 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली होती. बारामती निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून प्राप्त झालेल्या माहितीनुसार बारामती मतदारसंघातून 47 उमेदवार उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. गुरूवापर्यंत (दि.4) प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी येत्या 5 एप्रिल रोजी केली जाणार 8 एप्रिलपर्यंतच उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे.
काही उमेदवारांनी एक किंवा चार अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे 47 उमेदवारंचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुप्रिया सुळे यांनी चार अर्ज दाखल केले आहेत.तर भारतीय जनता पक्षाच्या कांचन कुल आणि रंजना कुल यांनी प्रत्येकी चार अर्ज केले आहेत.

बारामतीतून अर्ज भरलेल्या उमेदवारांची नावे
सुप्रिया सुळे, कांचन कुल, रंजना कुल, सविता कडाळे, शिवाजी नांदखिले, नवनाथ पडळकर, शिवाजी कोकरे, दिपक वाटविसावे, गिरीश पाटील, नवनाथ शिंदे, सागर कोंडेकर, मंगेश वनशिवे, विजयप्रकाश कोंडेकर, दशरथ राऊत, सुरेश वीर, विजयनाथ चांदेरे, गणेश जगताप,युवराज भुजबळ, नानासाहेब चव्हाण, उल्हास चोरमले, उमेश म्हेत्रे,चांगदेव कारंडे, हेमंत कोळेकर पाटील,शंकर तामकर, अलंकृता आवडे-बिचकुले, अंकुश जगताप, सचिन जाधव, प्रल्हाद महाडिक, प्रज्ञा कांबळे, विश्वनाथ गरगडे, सोमनाथ पोळ,

शिरूर मतदार संघासाठी ५१ अर्ज
शिरूर लोकसभा मतदार संघाची निवडणूक २ एप्रिलपासून प्रक्रिया सुरू झाली असून आत्ता पर्यंत २८ व्यक्तींनी एकूण ५१ अर्ज घेतले आहेत. त्यातील चिंचवड येथील आण्णासाहेब मगर नगर परिसरातील वहिदा
शेख आणि शिरूर तालुक्यातील इनामगाव येथील हनुमानवाडीचे बाळासाहेब घाडगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

Web Title: 32 candidates from Baramati, Dummy application of Ranjana Kul's nomination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.