पुरंदरमध्ये ३२ कोटींची विकासकामे मंजूर : आ. संजय जगताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:10 AM2021-07-26T04:10:07+5:302021-07-26T04:10:07+5:30
नीरा : "पुरंदर तालुक्यातील विविध विकासकामांसाठी वेगवेगळ्या विभागांमार्फत ३२ कोटींची विकासकामे मंजूर झाली आहेत. नीरा शहरासाठीसुद्धा यातील तीन ...
नीरा : "पुरंदर तालुक्यातील विविध विकासकामांसाठी वेगवेगळ्या विभागांमार्फत ३२ कोटींची विकासकामे मंजूर झाली आहेत. नीरा शहरासाठीसुद्धा यातील तीन कोटी उपलब्ध झाले असून नीरेच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही," असे आश्वासन पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी विविध विकासकामांच्या शुभारंभप्रसंगी दिले.
नीरा येथे आमदार संजय जगताप यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हा बँकेचे संचालक डॉ. दिगंबर दुर्गाडे, नीरा गावच्या सरपंच तेजश्री काकडे, उपसरपंच राजेश काकडे यांच्या उपस्थितीत या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
नीरा येथील प्रभाग दोन मधील रस्ते, प्रभाग चार मध्ये एक रस्ता व ड्रेनेज लाईन, प्रभाग दोनमधील रस्ता व सर्वजनिक शौचालयाच्या बांधकामांचे उद्घाटन संजय जगताप यांनी केले.
यावेळी जी.प.सदस्य दत्ता झुरुंगे, माजी जिल्हा परिषद सदस्य विराज काकडे, प्रवक्ते विजय भालेराव, चंदरराव धायगुडे, कल्याण जेधे, प्रहार जनशक्तीचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष मंगेश ढमाळ, माणिकराव चोरमले व सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार संजय जगताप म्हणाले की, तालुक्यातील प्रत्येक व्यक्तीचा विकास झाला पाहिजे यासाठी प्रयत्नशील आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, खा.सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुरंदरचा विकास होत आहे. त्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात निधीही उपलब्ध होत आहे. प्रास्तवीक सरपंच तेजश्री काकडे यांनी केले. सूत्रसंचालन अँड.विजय भालेराव यांना केले. तर आभार उपसरपंच राजेश काकडे यांनी मानले.