३२ कोटींचे अमली पदार्थ जाळले

By admin | Published: May 20, 2017 05:32 AM2017-05-20T05:32:33+5:302017-05-20T05:32:33+5:30

केंद्रीय सीमा शुक्ल विभागाने विविध ठिकाणी कारवाई करून जप्त केलेले मॅफेड्रॉनसह अन्य अंमली पदार्थ जाळून टाकण्यात आले.

32 crores of material was burnt | ३२ कोटींचे अमली पदार्थ जाळले

३२ कोटींचे अमली पदार्थ जाळले

Next

- लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : केंद्रीय सीमा शुक्ल विभागाने विविध ठिकाणी कारवाई करून जप्त केलेले मॅफेड्रॉनसह अन्य अंमली पदार्थ जाळून टाकण्यात आले. मुंढवातील भारत फोर्स कंपनीच्या भट्टीमध्ये ड्रग डिस्पोजल कमिटीच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली.

प्रथमच मोठा साठा नष्ट
सीमा शुल्क विभागाच्या (कस्टम) पुणे कार्यालयाकडून २०१५ मध्ये अंमली पदार्थ पकडण्यात आले. मेफेड्रॉन, हेरॉईन या जप्त केलेल्या अंमली पदार्थांची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तब्बल ३८ कोटी ७८ लाख रूपये इतकी आहे. विभागाने पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ जाळले असल्याचे सीमा शुक्ल विभागाचे आयुक्त एम. व्ही. एस. चौधरी यांनी सांगितले.

Web Title: 32 crores of material was burnt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.