सराफी पेढीतून ३२ लाखांचे दागिने चोरून कारागीर पसार, रविवार पेठेतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 06:21 PM2024-09-20T18:21:02+5:302024-09-20T18:22:32+5:30

मालकाने कारागिरांना सराफी पेढीत राहण्याची व्यवस्था करून दिली होती

32 lakh jewelery worth 32 lakhs stolen from Sarafi Pedhi | सराफी पेढीतून ३२ लाखांचे दागिने चोरून कारागीर पसार, रविवार पेठेतील घटना

सराफी पेढीतून ३२ लाखांचे दागिने चोरून कारागीर पसार, रविवार पेठेतील घटना

पुणे : रविवार पेठेतील एका सराफी पेढीतून ३२ लाख रुपयांचे दागिनेचोरून कारागीर पसार झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

याबाबत असित पोरिया (वय ४२ रा. मंगळवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी सराफी पेढीतील कामगार अमित पाल, मुकेश पंखिरा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोरिया यांची रविवार पेठेत श्रीकृष्ण गोल्डस्मिथ पेढी आहे. सराफ बाजारातील व्यावसायिक वेगवेगळे प्रकारचे दागिने घडविण्याचे काम पोरिया यांना देतात. त्यांच्या पेढीत आरोपी पाल, पंखिरा कारागिर होते. पोरिया यांच्या पेढीला सराफ बाजारातील एका नामांकित सराफी पेढीकडून ३३ मंगळसूत्र घडविण्याचे काम देण्यात आले होते. त्यांना सराफी पेढीकडून सोन्याची लगड देण्यात आली होती. दररोज रात्री काम झाल्यानंतर पोरिया सोन्याचे मोजमाप करायचे. कारागिरांना सराफी पेढीत राहण्याची व्यवस्था करून देण्यात आली होती.

पाल आणि पंखीरा सराफी पेढीतील एका कप्यात ठेवलेले सोने घेऊन पसार झाले. पाल आणि पंखीरा पेढीतून पसार झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पाहणी केली. तेव्हा कप्यात ठेवलेले साेने चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यानंतर पोरिया यांनी चौकशी केली. तेव्हा पाल आणि पंखीरा दागिने घेऊन पसार झाल्याचे समजले.

Web Title: 32 lakh jewelery worth 32 lakhs stolen from Sarafi Pedhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.