'३२ पाइनवूड ड्राइव्ह' - प्रगतशील हिंजवडीतील सर्वोत्तम पर्याय 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2019 04:51 PM2019-02-28T16:51:14+5:302019-02-28T18:10:08+5:30

नम्रता ग्रुप आणि भंडारी असोसिएट्स '32 पाइनवूड ड्राइव्ह' हे गृहसंकुल साकारत आहे.

32 Pinewood Drive- The Best Project In Hinjewadi | '३२ पाइनवूड ड्राइव्ह' - प्रगतशील हिंजवडीतील सर्वोत्तम पर्याय 

'३२ पाइनवूड ड्राइव्ह' - प्रगतशील हिंजवडीतील सर्वोत्तम पर्याय 

Next

पुणे शहरात आयटी हब म्हणून उदयास आलेल्या हिंजवडीत आता अत्याधुनिक सुविधांनी युक्त असलेली अनेक गृहसंकुले उभी राहताना दिसत आहेत. या गृहसंकुलांमुळे 'आयटी हब'सह हिंजवडीअधिक वेगाने विकसित होत आहे. याच विकासात नम्रता ग्रुप आणि भंडारी असोसिएट्सने मोठा हातभार लावला आहे. याठिकाणी नम्रता ग्रुप आणि भंडारी असोसिएट्स '32 पाइनवूड ड्राइव्ह' हे गृहसंकुल साकारत आहे.


हिंजवडीत अगदी मोक्याच्या ठिकाणी '32 पाइनवूड ड्राइव्ह' या गृहसंकुलाची निर्मिती होत आहे. '32 पाइनवूड ड्राइव्ह'मध्ये अनेक उत्कृष्ट दर्जाच्या अशा पायाभूत सुविधा देण्यात आल्या आहेत. यामध्ये स्विमिंग पूल, जिम्नॅशियम, फुटबॉल कोर्ट, क्लबहाऊस, पूलसाइड कॅफे यासारख्या अनेक गोष्टी आहेत. तसेच, '32 पाइनवूड ड्राइव्ह' या गृहसंकुलापासून अगदी हाकेच्या अंतरावर शाळा, कॉलेज, शहरातील महत्त्वाची रुग्णालये, बँका, एटीएम आणि अन्य जीवनावश्यक सुविधा  देखील आहेत. या प्रकल्पाचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या गृहसंकुलाचं मध्यवर्ती ठिकाण, पुण्यातील महत्त्वाच्या भागांशी असलेला थेट संपर्क आणि अगदी जवळ असलेला मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग (एक्सप्रेस वे).


देशाची आर्थिक राजधानी असलेलं मुंबई शहर येथून 136 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. त्यामुळे मुंबई-पुणे महामार्गाने आल्यास हिंजेवाडी फक्त १० मिनिटांच्या अंतरावर आहे. याशिवाय महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (MIDC) विकसित केलेले औद्योगिक शहर चाकण आणि तळेगाव अवघ्या 15 किलोमीटरच्या अंतरावर आहे. याचबरोबर, पुणे रेल्वे स्टेशन आणि पुणे एअरपोर्ट या महत्वाच्या ठिकाणांपर्यंतही पोहोचायचे अनेक मार्ग असल्याने '32 पाइनवूड ड्राइव्ह'मधील रहिवाशांना या प्रमुख ठिकाणी अगदी काही मिनिटांत पोहोचता येणार आहे.


गेल्या दशकभरात हिंजवडीमध्ये मोठ्या-मोठ्या आयटी कंपन्यांबरोबर तारांकित हॉटेल्स आणि अनेक गृहसंकुले उभारण्यात आली आहेत. त्यामुळे येथील नागरिकांची वाढती रहदारी लक्षात घेता येत्या काही काळात दळणवळणासाठी हिंजवडीतून मेट्रो धावणार आहे. मेट्रो प्रकल्पाच्या सध्याच्या टप्प्यात हिंजवडी ते शिवाजीनगर असा मेट्रो मार्ग प्रस्तावित आहे. मेट्रो सुरू झाल्यावर येथील उद्योगांना आणखी चालना मिळून रोजगार निर्मितीत वाढ होण्यास मदत होणार आहे. परिणामी आत्तापासूनच हिंजवडीमधील प्रॉपर्टी मार्केट वधारू लागले आहे. येथील प्रॉपर्टीला गुंतवणूक म्हणूनही फार मोठा वाव आहे. त्यामुळे इथल्या  '32 पाइनवूड ड्राइव्ह'मधील घर म्हणजे 'व्हॅल्यू फॉर मनी' असेच म्हणावे लागेल.

Web Title: 32 Pinewood Drive- The Best Project In Hinjewadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.