Pune | फ्लॅटचे आमिष दाखवून ३२ वर्षीय महिलेवर बलात्कार; पुणे जिल्ह्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 14:13 IST2023-01-10T14:10:35+5:302023-01-10T14:13:18+5:30
३२ वर्षीय महिलेशी जबरदस्तीने वारंवार शारीरिक संबंध...

Pune | फ्लॅटचे आमिष दाखवून ३२ वर्षीय महिलेवर बलात्कार; पुणे जिल्ह्यातील घटना
अवसरी (पुणे) : लग्नाचे तसेच फ्लॅट नावावर करण्याचे आमिष दाखवून ३२ वर्षीय महिलेशी जबरदस्तीने वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी डॉ. वैभव खंडेराव सुपेकर (वय ४६, रा. अवसरी बुद्रुक, ता. आंबेगाव) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना २०१९ ते ३१ डिसेंबर २०२२ दरम्यान घडली. सुपेकर याने सदर महिलेस वेळोवेळी लग्नाचे व फ्लॅट नावावर करण्याचे आमिष दाखविले. तसेच जीव देण्याची व महिलेच्या नवऱ्यास झालेल्या प्रकाराबाबत सांगण्याची धमकी देऊन वारंवार अत्याचार केला. याबाबत पीडित महिलेने मंचर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, सुपेकर यास १४ दिवस न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक भालेकर करीत आहेत.