३२० ग्रामपंचायतींमध्ये एक-दोन जागांसाठीच होणार मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:08 AM2021-01-10T04:08:42+5:302021-01-10T04:08:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांचा ज्वर दिवसेंदिवस वाढत आहे. उमेदवारांच्या प्रचार फेऱ्या सुरू झाल्या आहेत. ७८६ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांचा ज्वर दिवसेंदिवस वाढत आहे. उमेदवारांच्या प्रचार फेऱ्या सुरू झाल्या आहेत. ७८६ ग्रापंचायतींपैकी ८१ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. ६५० ग्रामपंचयातींच्या निवडणुका होत असल्या, तरी यातील जवळपास ३२० ग्रामपंचायतींत केवळ ४ ते ५ जागांसाठी निवडणुका लागल्या आहेत.
जिल्ह्यात ४ तारखेला अर्ज माघारीच्या दिवशी निवडणुकांचे चित्र स्पष्ट झाले. ४ हजार ९०४ प्रभागांसाठी ११ हजार ७ उमेदवार रिंगणात उभे आहेत. अनेक गावांनी ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले. काही ठिकाणी ग्रामपंचायती बिनविरोध करण्यात यश आले. तर, काही गावांत मोजक्याच प्रभागासाठी निवडणुका लागल्या आहेत. काही ठिकाणी केवळ एका जागेसाठी निवडणुका लागल्याने प्रशासनाला निवडणुकीची संपूर्ण तयारी या एका प्रभागासाठी किंवा एका जागेसाठी करावा लागणार आहे.
निवडणुकीसाठी आता केवळ ७ दिवस उरले आहेत. या दिवसांत मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी उमेदवार प्रयत्न करत आहेत. १४ तारखेला मकरसंक्रात असल्याने महिला उमेदवारांची ही संक्रात ग्रामपंचायतीच्या रणधुमाळीतच जाणार आहे.
या ग्रामपंचायतींमध्ये किती जण बिनविरोध
हवेली तालुक्यातील ३५ ग्रामपंचयातींमध्ये जवळपास १ ते २ उमेदवारांसाठी निवडणूक होणार आहे. कुंजीरवाडी येथे १, तरडे येथे ३, अष्टापूर येथे २, नायगाव येथे १, उरुळी कांचन १, सांगवी सांडस १, शिंदवणे १, डोंगरगाव १. केसनंद १, वडुखुर्द १, आर्वी १ तर बहुळी येथे २, मनेर येथे २, गाऊडदरा २ या ठिकाणी दोन ठिकाणी निवडणुका होणार आहे.