डी. जे वाजवणं पडलं महागात ; पाेलिसांनी केले 33 साऊंड सिस्टीम जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 05:41 PM2018-09-24T17:41:43+5:302018-09-24T17:46:15+5:30
विसर्जन मिरवणुकीत डी. जे. लावणाऱ्या 33 मंडळांचे डी. जेचे साहित्य जप्त करण्यात अाले असून 75 मंडळांवर गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.
पुणे : अावाज वाढव डी.जे म्हणत पुण्यातल्या रस्त्यांवर कानठळ्या बसवणाऱ्या अावाजात डी. जे लावणाऱ्या 33 साऊंड सिस्टीम मालकांना चांगलेच महागात पडले अाहे. न्यायालयाच्या अादेशाचा अवमान केल्याप्रकणी पुणे पाेलिसांनी 33 डी. जेचे साहित्य जप्त केले असून 75 प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.
उच्च न्यायालयाने गणेशाेत्सवात डी. जेवर बंदी घातली हाेती. त्यामुळे पाेलिसांनी मिरवणुकीत डी. जे. न वाजविण्याचे अावाहन गणेश मंडळांना केले हाेते. तसेच डी. जे . वाजविणाऱ्या मंडळांवर कारवाई करण्यात येईल असेही स्पष्ट करण्यात अाले हाेते. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी पत्रकार परिषद घेत न्यायालयाच्या अादेशाचे पालन करण्याचे अावाहन गणेश मंडळांना केले हाेते. तरीही पुण्यातील अनेक गणेश मंडळांनी बिंधास्त डी. जेचा दणदणाट पुण्यातील अनेक रस्त्यांवर केला. टिळक राेडवर एका मंडळाचे कार्यकर्ते तसेच पाेलिसांमध्ये बाचाबाचीचे प्रकरणही समाेर अाले अाहे. मिरवणुकीत डी. जे. वाजविणाऱ्या 33 मंडळाचे डी.जे चे साहित्य पाेलिसांनी जप्त केले अाहे. तसेच 75 प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल केला असल्याचे पाेलीस अायुक्त डाॅ. के . व्यंकटेशम यांनी सांगितले. तसेच व्हिडीअाे पाहून गरज पडल्यास पुढील कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले अाहे.
व्यंकटेशम म्हणाले, न्यायालयाच्या अादेशाच्या विराेधात जाऊन डी. जे लावणाऱ्या मंडळांची तपासणी करण्यासाठी विशेष पथकाची नेमणुक करण्यात अाली अाहे. पुण्यातील जास्तीत जास्त मंडळांनी डी. जे . बंदीचे पालन केले अाहे. ज्या मंडळांनी डी. जे वाजविले त्यांच्यावर पाेलिसांनी कारवाई केली अाहे. पुढेही व्हिडीअाे पाहून कारवाई करण्यात येणार अाहे. त्याचबराेबर विसर्जन मिरवणुकीसाठी पाेलिसांनी चाेख नियाेजन केले हाेते. काेणावर प्रतिबंधात्मक कारवाई करायची, कुठला अधिकारी काेठे असेल याबद्दल सुक्ष्म प्रमाणावर नियाेजन करण्यात अाले हाेते.