Pimpri Chinchwad: पार्ट टाईम जॉबच्या अमिषाने ३३ लाखांना गंडा, पिंपळे निलखमधील घटना

By प्रकाश गायकर | Published: January 9, 2024 07:17 PM2024-01-09T19:17:47+5:302024-01-09T19:18:33+5:30

ही घटना ९ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२३ या कालावधीत पिंपळे निलख येथे घडली...

33 lakhs cheated by Amisha of part time job, incident in Pimple Nilakh | Pimpri Chinchwad: पार्ट टाईम जॉबच्या अमिषाने ३३ लाखांना गंडा, पिंपळे निलखमधील घटना

Pimpri Chinchwad: पार्ट टाईम जॉबच्या अमिषाने ३३ लाखांना गंडा, पिंपळे निलखमधील घटना

पिंपरी : पार्ट टाईम जॉबच्य आमिषाने एकाची ऑनलाईन पद्धतीने ३२ लाख ९२ हजार ५६३ रुपयांची फसवणूक केली. ही घटना ९ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२३ या कालावधीत पिंपळे निलख येथे घडली. जयवंत शामराव पाटील (वय ४६, रा. विनायकनगर, पिंपळे निलख) यांनी या प्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अनु शर्मा आणि तीच्या इतर साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना एका मोबाईल क्रमांकावरून व्हॉट्सअप मेसेज आला. एका मार्केटींग कंपनीची भरती असून तुम्हाला पार्ट टाईम जॉब संदर्भात मी सल्ला देत आहे, असे या मेसेजमध्ये नमूद होते. त्यानंतर संबंधित अनु शर्मा हीने फिर्यादी यांना वेळोवेळी ऑनलाईन टास्क देऊन ३२ लाख ९२ हजार ५६३ रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. मात्र, फिर्यादी यांना या बदल्यात कोणताही मोबदला न देता त्यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.  

Web Title: 33 lakhs cheated by Amisha of part time job, incident in Pimple Nilakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.