महापालिकेच्या ३३ अभ्यासिकांना कुलूप; शहरातील गरीब, मागासवर्गीय विद्यार्थ्यांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 04:59 AM2018-03-21T04:59:11+5:302018-03-21T04:59:11+5:30

महापालिकेच्या समाजविकास विभागाच्या वतीने शहरातील गरीब व मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका वर्ग चालविले जातात. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी डी.एस., बी.एड. अथवा किमान पदवीधर असलेल्यांची नियुक्ती केली जाते.

 33 students of the Municipal Corporation; Inconvenience to poor, backward class students in the city | महापालिकेच्या ३३ अभ्यासिकांना कुलूप; शहरातील गरीब, मागासवर्गीय विद्यार्थ्यांची गैरसोय

महापालिकेच्या ३३ अभ्यासिकांना कुलूप; शहरातील गरीब, मागासवर्गीय विद्यार्थ्यांची गैरसोय

Next

पुणे : महापालिकेच्या समाजविकास विभागाच्या वतीने शहरातील गरीब व मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका वर्ग चालविले जातात. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी डी.एस., बी.एड. अथवा किमान पदवीधर असलेल्यांची नियुक्ती केली जाते. परंतु, शहरातील ३३ अभ्यासिका सध्या बंद असून, मार्गदर्शक मिळत नसल्याने त्यांना कुलूप लावण्यात आल्याचे समाजविकास अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे शहरातील हजारो गरीब, मागासवर्गी विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शहरातील गरीब व मागासवर्गीय इयत्ता ५वी ते इयत्ता १०वीच्या विद्यार्थ्यांसाठी शहरात महापालिकेच्या वतीने अभ्यासिका चालविल्या जातात. शहरातील वस्तीपातळीवरील समाजमंदिरे, महापालिकेच्या शाळांचे हॉल, वर्गखोल्या अभ्यासिकांसाठी उपलब्ध करून दिल्या जातात. याशिवाय, महापालिकेच्या वतीने शहरात १४२ ठिकाणी अभ्यासिका बांधण्यात आल्या आहेत. या विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे, त्यांची शैक्षणिक प्रगती होण्यासाठी शाळा सुरू होण्यापूर्वी व शाळा सुटल्यानंतर अभ्यासिका वर्ग घेण्यात येतात.
यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मासिक मानधनावर डी.एस., बी.एड. अथवा किमान पदवीधर असलेल्यांची नियुक्ती केली जाते.
सध्या केवळ १०९ अभ्यासिका सुरू आहेत; परंतु केवळ पात्र मार्गदर्शक मिळत नसल्याने शहरातील ३३ अभ्यासिकांना कुलूप लावल्याचे समोर आले आहे. नगरसेविका पल्लवी जावळे यांनी लेखी प्रश्न विचारले होते. यावर प्रशासनाने उत्तर दिले असून, त्यामध्ये ही माहिती समोर आली आहे.

अभ्यासासाठी जागा नसल्याने अडचण
वस्तीपातळीवर घरातील वातावरणामुळे अभ्यासात अनेक अडचणी येतात. अनेक वेळा हुशार व होतकरू विद्यार्थ्यांची केवळ अभ्यासासाठी जागा नसल्याने अडचण होते. या गोष्टी लक्षात घेऊन महापालिकेच्या समाजविकास विभागाच्या वतीने शहरातील गरीब व मासागवर्गीय विद्यार्थ्यांसाठी विविध भागांत कोट्यवधी रुपये खर्च करून अभ्यासिका बांधलेल्या आहेत, परंतु, सध्या ऐन परीक्षांच्या हंगामात या अभ्यासिका बंद असल्याने विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे.

Web Title:  33 students of the Municipal Corporation; Inconvenience to poor, backward class students in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे