जलयुक्त शिवार योजनेच्या कामासाठी ३३.७१ कोटींचा निधी            

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 07:15 PM2019-05-18T19:15:59+5:302019-05-18T19:20:03+5:30

राज्यात भूपृष्टावर व भूर्भात पाण्याची उपलब्धता वाढावी,पावसाचे अधिकाधिक पाणी जमिनीत मुरावे तसेच शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दूर व्हावा; या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत केल्या जाणा-या कामांसाठी राज्य शासनाने पुणे विभागाला ३३.७१ कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे. त्यामुळे निधी आभावी काही काळ प्रलंबित असणा-या कामांना गती मिळणार आहे.

33.71 crore fund is released by government for the work of Jalyukt shivar scheme | जलयुक्त शिवार योजनेच्या कामासाठी ३३.७१ कोटींचा निधी            

जलयुक्त शिवार योजनेच्या कामासाठी ३३.७१ कोटींचा निधी            

Next

पुणे: राज्यात भूपृष्टावर व भूर्भात पाण्याची उपलब्धता वाढावी,पावसाचे अधिकाधिक पाणी जमिनीत मुरावे तसेच शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दूर व्हावा; या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत केल्या जाणा-या कामांसाठी राज्य शासनाने पुणे विभागाला ३३.७१ कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे. त्यामुळे निधी आभावी काही काळ प्रलंबित असणा-या कामांना गती मिळणार आहे.

राज्य शासनातर्फे जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१८-१९ मध्ये पुणे विभागातील कोल्हापूर,सातारा,सांगली,सोलापूर आणि पुणे या पाच जिल्ह्यातील ६०२ गावात ११ हजार ६९ कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. त्यातील ८ हजार ४४६ कामे पूर्ण झाली असून १ हजार ८२५ कामे प्रगतीपथावर आहेत. त्यात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक २१३ गावांमध्ये ३ हजार ८८१ कामे प्रस्तावित करण्यात आली असून त्यातील २ हजार ७६५ कामे पूर्ण झाली आहेत.तर जिल्ह्यातील १ हजार ४ कामे प्रगतीपथावर आहेत. शासनाकडून पुणे जिल्ह्यातील कामांसाठी ११.९२ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.

जलयुक्त शिवारच्या माध्यमातून कंपार्टमेंट बंडिंग, सलग समतल चर, खोल सलग समपातळी चर ,शेततळे व वनतळे, अनघड दगडाचे बांध, माती नाला बांध व दुरूस्ती, सिमेंट बंधारा, पाझर तलाव दुरूस्ती, नाला खोलीकरण व रुंदीकरंण, विहिर बोअर पुनर्भरण, तलावातील व धरणातील गाळ काढणे आदी कामे केली जात आहेत. त्यामुळे भूपृष्टावरील व भूगर्भातील पाणी साठ्यात वाढ होणार आहे.

पुणे विभागात केल्या जाणा-या जलयुक्त शिवारच्या कामांमुळे २६ हजार ८१४ टीसीएम पाणीसाठा निर्माण निर्माण होईल, अशी शक्यता प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे. त्यातही पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ८ हजार २८८ टीसीएम, सोलापूर जिल्ह्यात ८ हजार १४१ टीसीएम, सांगली जिल्ह्यात 6 हजार ७८३ टीसीएम, साता-यात २ हजार १२६ आणि कोल्हापूरमध्ये १ हजार ४७७ टीसीएम पाणीसाठा वाढणार आहे.

Web Title: 33.71 crore fund is released by government for the work of Jalyukt shivar scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.