३३९ वा पालखी सोहळा! आज तुकोबाराया निघणार विठ्ठलाच्या दर्शनाला 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 09:04 AM2024-06-28T09:04:22+5:302024-06-28T09:05:33+5:30

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान

339th ceremony Today Tukobaraya will leave for Vitthal's darshan  | ३३९ वा पालखी सोहळा! आज तुकोबाराया निघणार विठ्ठलाच्या दर्शनाला 

३३९ वा पालखी सोहळा! आज तुकोबाराया निघणार विठ्ठलाच्या दर्शनाला 

लोकमत न्यूज नेटवर्क, देहूगाव : जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे देहू येथून शुक्रवारी दुपारी दोन वाजता पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार असल्याची माहिती पालखी सोहळा प्रमुख माणिक महाराज मोरे यांनी दिली. पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहण्याची शक्यताही 
त्यांनी वर्तवली.

आषाढी वारीनिमित्त देहूतून तुकोबारायांची पालखी पंढरपूरला जाते. यंदा ३३९ वा पालखी सोहळा आहे. त्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख विशाल महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, विश्वस्त भानुदास महाराज मोरे, संजय महाराज मोरे, अजित महाराज मोरे यांनी पालखी प्रस्थान सोहळ्याचे नियोजन केले आहे.

जगद्‌गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे शुक्रवारी पंढरपूरसाठी प्रस्थान होणार असून त्यांच्यासोबत पंढरपूरला जाण्यासाठी  देहूनगरीत वारकऱ्यांची मांदियाळी दाखल झाली आहे. एक भाविक महिला विठुरायाच्या मूर्तीसह आलेली असताना तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

Web Title: 339th ceremony Today Tukobaraya will leave for Vitthal's darshan 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.