३४ लाखांचा दंड वसूल
By admin | Published: October 18, 2015 12:12 AM2015-10-18T00:12:00+5:302015-10-18T00:12:00+5:30
वाघोली, लोणीकंद व भावडी (ता.हवेली) येथील खाण व क्रशरमालकांची हवेलीच्या महसूल विभागाने अनधिकृत गौणखनिज उत्खनन वाहतूक करणारी वाहने ताब्यात घेऊन
लोणी काळभोर : वाघोली, लोणीकंद व भावडी (ता.हवेली) येथील खाण व क्रशरमालकांची हवेलीच्या महसूल विभागाने अनधिकृत गौणखनिज उत्खनन वाहतूक करणारी वाहने ताब्यात घेऊन दंडात्मक कारवाई करत जोरदार दणका दिल्याने हवेलीच्या महसूलमध्ये आज अखेर तब्बल ३४ लाख ६ हजार ३४० रुपये दंड वसूल झाल्याची माहिती महसूलचे नायब तहसीलदार समीर यादव यांनी दिली.
१४ आॅक्टोबर रोजी तसेच मार्च ते आॅक्टोबर या कालावधीत अनधिकृतपणे गौणखनिजाची वहातूक करणा-या एकून ४१३ वहानांवर कारवाई करण्यात आली. त्यामध्ये वाळू प्रति ब्रास २६ हजार ६२० रुपये, क्रशसॅन्ड प्रति ब्रास १६ हजार ४०० रुपए, तर खडी प्रति ब्रास १३ हजार ४०० रुपये प्रमाणे रॉयल्टी अधिक दंड आकारण्यात आला त्याची एकून रक्कम ७४ लाख २९हजार रुपये एवढी जमा झाली आहे.
महसूल विभागाच्या पथकाने अनधिकृतपणे गौणखनिज वाहतूक करणा-या गाड्यावर आपला मोर्चा वळवल्याने यातील मातब्बरांना चांगलाच झटका बसला. खाण क्रशर मालक चालक संघटनेने तातडीने बैठक घेतली परंतु हवेलीचे तहसीलदार दगडू कुंभार हे कारवाईवर ठाम राहिल्याने रात्री उशिरापर्यंत वाघोली येथील तलाठी व मंडलाधिकारी कार्यालयात अंदाजे २८ लाख रुपये रोख स्वरूपात जमा झाले होते. (वार्ताहर)