शहरात ३४६ नवे कोरोनाबाधित, २८७ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:08 AM2021-07-22T04:08:33+5:302021-07-22T04:08:33+5:30
पुणे : शहरात शनिवारी दिवसभरात ३४६ कोरोनाबाधित आढळून आले असून २८७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात ७ जणांचा मृत्यू ...
पुणे : शहरात शनिवारी दिवसभरात ३४६ कोरोनाबाधित आढळून आले असून २८७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात ७ जणांचा मृत्यू झाला असून २ हजार ८६७ सक्रिय रुग्ण आहेत.
खासगी तसेच शासकीय स्वाब तपासणी केंद्रांवर ९ हजार ६९७ नागरिकांची तपासणी करण्यात आली. दिवसभरात ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, पुण्याबाहेरील ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २२७ रुग्ण गंभीर असून ३८७ ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. शहरातील तब्बल २८ लाख ८ हजार ८८४ जणांची तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ८४ हजार ७०२ नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती. यापैकी ४ लाख ७३ हजार १२६ नागरिक कोरोनामुक्त झाले आहेत. शहरात आजपर्यंत ८ हजार ८६७ जणांचा मृत्यू झाला आहे.
----
पुण्यातील कोरोनास्थिती
बुधवारी बाधित - ३४६
घरी सोडले - २८७
एकूण बाधित रुग्ण - ४, ८४, ७०२
सक्रिय रुग्ण - २, ८६७
आजचे मृत्यू - ७
एकूण मृत्यू - ८, ८६७