एकट्या पुण्यातून शासनाला ३४८८ कोटींचा महसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:10 AM2021-04-10T04:10:48+5:302021-04-10T04:10:48+5:30

सुषमा नेहरकर-शिंदे लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : एक वर्षांपासून कोरोनामुळे खासगीसह शासनाच्या महसुलाला फार मोठा फटका बसला आहे. परंतु, ...

3488 crore revenue to the government from Pune alone | एकट्या पुण्यातून शासनाला ३४८८ कोटींचा महसूल

एकट्या पुण्यातून शासनाला ३४८८ कोटींचा महसूल

Next

सुषमा नेहरकर-शिंदे

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : एक वर्षांपासून कोरोनामुळे खासगीसह शासनाच्या महसुलाला फार मोठा फटका बसला आहे. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बांधकाम विभागाला दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने मुद्रांक शुल्कात दिलेल्या सवलतीमुळे पुणे शहरात दस्तनोंदणीत मोठी वाढ झाली आहे. एकट्या पुणे शहरामध्ये कोरोनाच्या संकटातही तब्बल २ लाख ४ हजार ३५९ दस्तांची नोंदणी झाली. यामधून शासनाला तब्बल ३४८८ कोटी रुपयांचा महसूल मिळाला.

बांधकाम क्षेत्रातील मंदी आणि त्यात आलेले कोरोनाचे संकट यामुळे संकटात सापडलेल्या बांधकाम क्षेत्राला उभारी देणे व सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी शासनाने ऑगस्ट महिन्यात मुद्रांक शुल्कात दोन टप्प्यांत सवलत देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत तीन टक्के, तर १ जानेवारी ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत दोन टक्के सवलत देण्यात आली.

३१ डिसेंबरपर्यंत ऑनलाईन चालान भरल्यानंतर पुढील चार महिने खरेदी विक्रीच्या व्यवहारात तीन टक्के सवलत मिळणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केले. यामुळे याचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी ऑगस्टपासूनच दस्त नोंदणीसाठी गर्दी करण्यास सुरुवात केली. यामध्ये महिन्यात तर दस्त नोंदणीचा उच्चांक झाला. एका डिसेंबर महिन्यात ३९ हजार ९४६ दस्त नोंदणीतून ९३२ कोटींचा महसूल जमा झाला. कोरोनाच्या पहिल्या लाटेत झालेला सर्व तोटा शासनाच्या सवलतीनंतर भरून निघाला.

--

पुणे शहरामध्ये गेल्या एक वर्षभरात झालेली दस्त नोंदणी व महसूल

महिना दस्त नोंदणी महसूल (कोटीत)

एप्रिल ० (लाॅकडाऊन) ०

मे १०८० २९.५९

जून ८०६८ १५७.१५

जुलै ९४३४ २००.३८

ऑगस्ट १३२९४ २३१.२

सप्टेंबर १८०३२ २४५.८३

ऑक्टोबर १९२४८ ३०८.७६

नोव्हेंबर २२०६१ २३९.१९

डिसेंबर ३९९४६ ९३२.९३

जानेवारी २२०७१ ३२५.४९

फेब्रुवारक २२१०२ २६४.५६

मार्च २८९१४ ५५३.४६

एकूण २०४३५९ ३४८८.५४

Web Title: 3488 crore revenue to the government from Pune alone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.