पुण्यातील ३५ पोलीस अधिकारी विशेष सेवा पदकाने सन्मानित होणार

By admin | Published: December 18, 2015 02:25 AM2015-12-18T02:25:58+5:302015-12-18T02:25:58+5:30

राज्यातील नक्षलग्रस्त भागात दोन वर्षे समाधानकारक सेवा बजावत कठीण आणि खडतर कामगिरीबद्दल पुण्यातील तब्बल ३५ सहायक निरीक्षक, तसेच उपनिरीक्षकांना पोलीस

35 policemen will be honored by the Special Service Medal in Pune | पुण्यातील ३५ पोलीस अधिकारी विशेष सेवा पदकाने सन्मानित होणार

पुण्यातील ३५ पोलीस अधिकारी विशेष सेवा पदकाने सन्मानित होणार

Next

पुणे : राज्यातील नक्षलग्रस्त भागात दोन वर्षे समाधानकारक सेवा बजावत कठीण आणि खडतर कामगिरीबद्दल पुण्यातील तब्बल ३५ सहायक निरीक्षक, तसेच उपनिरीक्षकांना पोलीस महासंचालकांचे ‘विशेष सेवा पदक’ जाहीर करण्यात आले आहे. पदकविजेत्या अधिकाऱ्यांचे पोलीस आयुक्त के. के. पाठक आणि सह पोलीस आयुक्त सुनील रामानंद यांनी अभिनंदन केले आहे.
सहायक पोलीस निरीक्षक संदेश अरुण केंजळे, प्रमोद मारोतराव कठाणे, अमोल माणिकराव देवकर, महेंद्र पंढरी कदम, विष्णू दत्तात्रय केसरकर, संजय गुंडा चव्हाण, राहुल विक्रमसिंग गौड, बसवराज धोंडिबा चिट्टे, अभिजित मधुकर जाधव, सागर शिवाजी पानमंद, तानाजी शंकर भोगम, परवेज रमजान शिकलगार, संतोष वसंत तासगावकर, सोमनाथ बाजीराव नाळे, गिरीधर नकुल यादव, संदीप लक्ष्मण साळुंके, मनोज दादासाहेब पाटील, संदीप अंकुश जमदाडे, चंद्रकांत विनायक जाधव, उमाजी तुकाराम राठोड, संतोष बळीराम पाटील, मनमित विलास राऊत, बालाजी गोविंदराव शेंडगे, वैभव श्रीरंग पवार, नारायण आश्रुबा मिसाळ, सुरेश चमरू मट्टामी, सतीश काशिनाथ
आडे, संदीप प्रमोद यादव, गणेश
गोविंद पवार, जुबेरअहमद चाँदसाहेब मुजावर, पृथ्वीराज योगिराम ताटे,
अतुल बाळासाहेब माळी, पवन मनोहर पाटील, अंबरिश देशमुख अशी पदक जाहीर झालेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: 35 policemen will be honored by the Special Service Medal in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.