नीरेत विषारी वायूगळतीने ३५ कामगार बाधित :चौघांची प्रकृती गंभीर  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 09:50 PM2019-04-17T21:50:24+5:302019-04-17T21:54:13+5:30

नीरा (ता. पुरंदर) येथील ज्युबिलंट लाईफ सायन्सेस या केमीकल कंपनीत आज विषारी वायूगळतीने सुमारे ३५  जण बाधीत झाले. त्यांना श्वसनक्रीयेत अडथळा व पोटात अस्वस्थता जाणवत असून नीरा व लोणंद येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी तीन ते चार जण अत्यवस्थ असल्याचे समजते. 

35 workers injured in poisonous gas | नीरेत विषारी वायूगळतीने ३५ कामगार बाधित :चौघांची प्रकृती गंभीर  

नीरेत विषारी वायूगळतीने ३५ कामगार बाधित :चौघांची प्रकृती गंभीर  

Next

 

पुणे  : नीरा (ता. पुरंदर) येथील ज्युबिलंट लाईफ सायन्सेस या केमीकल कंपनीत आज विषारी वायूगळतीने सुमारे ३५  जण बाधीत झाले. त्यांना श्वसनक्रीयेत अडथळा व पोटात अस्वस्थता जाणवत असून नीरा व लोणंद येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी तीन ते चार जण अत्यवस्थ असल्याचे समजते. 

नीरा येथील ज्युबिलंट कंपनी ही अल्कोहोल व केमीकल उत्पादन करते. या कंपनीत अ‍ॅसिटेट अनहायड्राईडचा एक प्लाँट आहे. यामधून आज दुपारी साडेचार वाजता ओव्हरफ्लोमुळे वायुगळती झाली. हा वायू झपाट्याने कंपनी परिसरात पसरला आणि कामगारांना चक्कर येऊ लागली. श्वसनास त्रास होऊ लागला आणि उलट्या व मळमळ सुरू झाली. यामुळे कामगारांनी मिळेल त्या बाजूने कंपनीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. कंपनीत सुमारे अडीचशे कामगार आहेत. त्यापैकी सुमारे ३५ कामगारांना श्वसनाचा गंभीर त्रास जाणवू लागल्याने त्यांना नीरा व लोणंद येथील खासगी रूग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. यापैकी लोणंद येथील रूग्णालयात तीन ते चार लोक अत्यवस्थ आहेत. अन्य रूग्णांची प्रकृती ठीक असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. या वायूगळतीमुळे परिसरातील कंपनीजवळील शेतामध्ये काम करत असलेल्या शेतकरी व मजुरांनाही उलट्या व मळमळीचा त्रास झाल्याची माहिती पाडेगाव येथील ग्रामस्थांनी दिली. 

दीपक सोनटक्के ,कंपनीचे मनुष्यबळ विकास अधिकारी :कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढले आहे. कुठल्या वायूची गळती झाली आणि किती जणांना त्रास झाला आहे याचा शोध घेत.

Web Title: 35 workers injured in poisonous gas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.