मेंदी काढून ३५० महिलांचा सन्मान
By admin | Published: February 22, 2017 03:05 AM2017-02-22T03:05:18+5:302017-02-22T03:05:18+5:30
महानगरपालिका निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावे, यासाठी शहरात विविध योजना
पुणे : महानगरपालिका निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावे, यासाठी शहरात विविध योजना राबवण्यात आल्या. मृगनयनी मेंदी आटर््स आणि साईनाथ मंडळ ट्रस्टतर्फे मतदान केंद्राबाहेर पडणाऱ्या सुमारे ३५० महिला मतदारांना देत मेंदी काढून सन्मानित करण्यात आले.
ज्याप्रमाणे बोटावर शाई लावून मतदारांना लोकशाही प्रक्रियेत सहभागी झाल्याबद्दल प्रोत्साहित केले जाते, त्याचप्रमाणे लोकशाहीमध्ये ५० टक्के सहभागी असणाऱ्या महिला आणि तरुणींनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करावे, यासाठी बोटावरील निळ्या शाईप्रमाणे नक्षीदार मेंदीने महिलावर्गाचा अनोखा सन्मान करण्यात आला.
शहराच्या मध्यभागातील बाजीराव रस्त्यावरील सरस्वती मंदिर प्रशाला, आदर्श विद्यालय, गोपाळ हायस्कूल आणि नूतन मराठी विद्यालय प्राथमिक व माध्यमिक शाळा या परिसरात मृगनयनी मेंदी आर्ट्सच्या धनश्री हेंद्रे आणि त्यांच्या सहकारी महिलांनी मतदारांच्या हातावर मेंदी काढली. साईनाथ मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष पीयुष शहा आणि कार्यकर्त्यांनी मतदान जनजागृती केली. ललिता दर्गे, मेघा मेहेत्रे, रश्मी भंडारी, पल्लवी बंबोली, अक्षदा व्यास, मोनिका शर्मा, अक्षय भोई, बालाजी गोडगिरी, प्रीती तांदळे, योगिता भांबुरे, साक्षी म्हस्के, शिल्पा रेळेकर, स्मिता काळे, प्रिया पाटोळे, कीर्ती मोहिते आदींनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. (प्रतिनिधी)