ऊस उत्पादकांना ठिबकसाठी एकरी ३५ हजार बिनव्याजी !

By admin | Published: December 17, 2015 02:07 AM2015-12-17T02:07:57+5:302015-12-17T02:07:57+5:30

दिवसेंदिवस जाणवणारी पाणीटंचाई, रासायनिक खतांची बचत व कार्यक्षमतेने वापर होणे, जमिनीची सुपीकता टिकवून ठेवणे यांसाठी ठिबक सिंचन हे प्रभावी व गरजेचे असल्याने भीमाशंकर सहकारी साखर कारखाना

35,000 bills for sugarcane growers! | ऊस उत्पादकांना ठिबकसाठी एकरी ३५ हजार बिनव्याजी !

ऊस उत्पादकांना ठिबकसाठी एकरी ३५ हजार बिनव्याजी !

Next

अवसरी : दिवसेंदिवस जाणवणारी पाणीटंचाई, रासायनिक
खतांची बचत व कार्यक्षमतेने वापर होणे, जमिनीची सुपीकता टिकवून ठेवणे यांसाठी ठिबक सिंचन हे प्रभावी व गरजेचे असल्याने भीमाशंकर सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांसाठी महत्त्वाकांक्षी
ठिबक योजना राबविणार असल्याची माहिती उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली.
भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याकडे विविध ठिबक संच उत्पादित/पुरवठादार कंपन्यांकडून आलेल्या प्रस्तावाबाबत कारखान्याचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये ठिबक सिंंचनवाढीसाठी योजना राबविण्याचे ठरविण्यात आले आहे.
बेंडे यांनी याविषयी अधिक माहिती देताना नमूद केले, की ठिबक योजनेअंतर्गत ठिबक संच बसविणाऱ्या शेतकऱ्यांचा एकरी ५ हजार रुपये रक्कम कारखान्याकडे जमा करणे आवश्यक आहे. त्यानंंतर कारखाना सूचनेनुसार शेतकऱ्यांकडून आवश्यक कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर ठिबक क्षेत्राचा आवश्यक आराखडा व संचउभारणी पूर्ण झाल्यानंतर शेतकी विभागाच्या शिफारशीनुसार एकरी २५ हजार रुपये बिनव्याजी वसूलपात्र रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या वतीने कारखान्यामार्फत ठिबक संचपुरवठाधारकाला देण्यात येईल.
याव्यतिरिक्त एकरी १० हजार रुपयांसाठी कारखान्याशी करार केले. कंपनी १४ महिन्यांकरिता बिनव्याजी थांबणार आहे. अशा प्रकारे ३५ हजार रुपये बिनव्याजी रक्कम शेतकऱ्यांच्या गाळपास किंवा बेण्यास येणाऱ्या ऊस पेमेंटमधून कपात करण्यात येईल, असे बेंडे यांनी सांगितले.
ते म्हणाले, ‘‘कपात केलेल्या रकमेपैकी १० हजार रुपये संबंधित ठिबक सिंचन कंपनीला अदा केले जातील. वरील योजना कारखान्याने शासनमान्यप्राप्त ठिबक उत्पादक/पुरवठादार कंपनीबरोबर रीतसर करार करण्यात येऊन राबविताना शेतकऱ्यांसाठी
विविध सेवासुविधांचा अंतर्भाव असेल. त्यामध्ये प्रामुख्याने
एका वर्षाचा ठिबक संच विमा तसेच १ लाखाचा वैयक्तिक शेतकरी
विमा यासाठी प्रिमीयम रक्कम पुरवठादार कंपनीमार्फत भरली जाणार आहे.’’ (वार्ताहर)

Web Title: 35,000 bills for sugarcane growers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.