कसब्यातील ३६ टक्के OBC समाज 'मविआ' च्या पाठीशी उभा राहणार; विजय वडेट्टीवारांचा विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 01:56 PM2023-02-23T13:56:01+5:302023-02-23T13:56:08+5:30

असंविधानिक मार्गाने सत्तेवर आलेल्या शिंदे व भाजप सरकारने अडथळा निर्माण करून ओबीसींना दूर ढकलल्याची भावना सर्वत्र पसरली

36 percent of the OBC community in the town will stand behind 'Mavia'; Faith of Vijay Vadettivar | कसब्यातील ३६ टक्के OBC समाज 'मविआ' च्या पाठीशी उभा राहणार; विजय वडेट्टीवारांचा विश्वास

कसब्यातील ३६ टक्के OBC समाज 'मविआ' च्या पाठीशी उभा राहणार; विजय वडेट्टीवारांचा विश्वास

googlenewsNext

पुणे : राज्यात आणि केंद्रात भाजप सत्तेत असूनही या मंडळींनी ओबीसींच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे कसब्यातील ३६ टक्के ओबीसी समाज महाविकास आघाडीच्या पाठीशी उभा राहील, असा विश्वास काँग्रेसचे नेते व माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी येथे व्यक्त केला. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी वडेट्टीवार पुण्यात आले असता काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

वडेट्टीवार म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार असताना ओबीसी खात्याचा मंत्री म्हणून आपण ओबीसी बांधवांसाठी वर्ग तीन, वर्ग चारच्या सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण, घरकुल, विद्यार्थ्यांना वसतिगृह, स्वाधार योजना तसेच महाज्योती संस्था आदी कामांचा पायाभूत आराखडा निश्चित केला होता. असंविधानिक मार्गाने सत्तेवर आलेल्या शिंदे व भाजप सरकारने अडथळा निर्माण करून ओबीसींना दूर ढकलल्याची भावना सर्वत्र पसरली आहे.
राज्यात मंत्रिमंडळ पूर्ण अस्तित्वात आले नसून, केवळ आमदार पोसण्याचे काम सुरु आहे. या मंडळींना विकास व सामान्य माणूस दिसत नाही. जात व धर्मात भांडणे लावायची एवढाच उद्योग त्यांनी सुरु ठेवला आहे. पायाखालची वाळू सरकल्याने भाजपच्या मंडळींनी बेताल वक्तव्ये सुरु केली आहे. सोशल मीडियात शिव्या खाण्याच्या प्रकारावरून ते किती अस्वस्थ झाले आहेत हे ध्यानात येते, असेही वडेट्टीवार यांनी सांगितले.

Web Title: 36 percent of the OBC community in the town will stand behind 'Mavia'; Faith of Vijay Vadettivar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.