डिंभे धरणात ३६ टक्के पाणीसाठा शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:11 AM2021-05-13T04:11:03+5:302021-05-13T04:11:03+5:30

आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात घोडनदीवर बांधण्यात आलेल्या डिंभे धरणाच्या पाणीसाठ्यात यंदा झपाट्याने घट होत आहे. पाणीसाठ्याच्या दृष्टीने कुकडी प्रकल्पातील ...

36% water balance in Dimbhe dam | डिंभे धरणात ३६ टक्के पाणीसाठा शिल्लक

डिंभे धरणात ३६ टक्के पाणीसाठा शिल्लक

googlenewsNext

आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात घोडनदीवर बांधण्यात आलेल्या डिंभे धरणाच्या पाणीसाठ्यात यंदा झपाट्याने घट होत आहे. पाणीसाठ्याच्या दृष्टीने कुकडी प्रकल्पातील हे सर्वांत मोठे धरण आहे. या धरणाच्या पाणीसाठ्यावरच नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, पारनेर, करमाळा या तालुक्यातील गावे, तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, शिरूर तालुक्यातील गावांचा पाणीपुरवठा अवलंबून असतो. पावसाळ्यात धरणातून खरीप व रब्बीसाठी आवर्तने झाल्याने या धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला आहे. यामुळे पाणलोट क्षेत्रातील बोरघर-अडिवरे,पाटण-महाळुंगे व बेंढारवाडी येथील पाणलोट क्षेत्र मोकळे होऊ लागल्याचे चित्र आहे. या धरणाच्या पाण्यावरच आदिवासी भागातील पोखरी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना अवलंबून असून या भागातील सहा गावांना या योजनेतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने धरणातील पाण्याचे बाष्पीभवनही होत असून धरणातून दररोज जवळपास ९ ते १० मि.मि.पाण्याचे बाष्पीभवन होत आहे.

डिंभे धरणात आजमितीस ३६ टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक राहीला असून पावसाळ्याच्या तोंडावर आदिवासी गावांना पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागण्याची चिन्हे आहेत.(छायाचित्र-कांताराम भवारी)

Web Title: 36% water balance in Dimbhe dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.