शॉर्टसर्किटमुळे ३८ एकर ऊस खाक

By admin | Published: December 3, 2014 02:55 AM2014-12-03T02:55:16+5:302014-12-03T02:55:16+5:30

शॉर्टसर्किटमुळे येथील ३८ एकर ऊस जळून खाक झाला. ग्रामस्थ तसेच विघ्नहरच्या यंत्रणेने शर्र्थीचे प्रयत्न करूनदेखील आग आटोक्यात आली नाही

38 acres of sugarcane khak due to the short circuit | शॉर्टसर्किटमुळे ३८ एकर ऊस खाक

शॉर्टसर्किटमुळे ३८ एकर ऊस खाक

Next

ओझर : शॉर्टसर्किटमुळे येथील ३८ एकर ऊस जळून खाक झाला. ग्रामस्थ तसेच विघ्नहरच्या यंत्रणेने शर्र्थीचे प्रयत्न करूनदेखील आग आटोक्यात आली नाही. जुन्नर तालुक्यातील हिवरे बुद्रुक येथील सहकारनगर वस्तीमध्ये ही घटना घडली.
जळीताची एवढी गंभीर घटना घडूनही वीज वितरण कंपनीचा कोणताही वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी फिरकला देखील नाही.
ट्रान्सफार्मवर असलेला
अतिरिक्त लोड, झुकलेले पोल, तारांना पडलेला झोळ, ट्रान्सफार्मरची दयनीय अवस्था यामुळे दरवर्षी शॉर्टसर्किटमुळे तालुक्यात २०० ते २५० एकरपेक्षा जास्त ऊस जळून खाक होतो.
यावर्षी ऊसतोडणी
हंगामाच्याच सुरुवातीलाच २०० एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाला असल्याची माहिती विघ्नहरचे मुख्य शेती अधिकारी इंद्र्रभान कडू यांनी दिली.
२८ शेतकरी वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणाचे शिकार झाले.
विघ्नहरचे चेअरमन
सत्यशील शेरकर यांनी घटनास्थळी भेट देऊन सर्व प्रशासकीय यंत्रणा कामाला लावून जळालेला
ऊस २४ तासांच्या आतमध्ये गळितास आणला. महसूल विभाग, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी
सचिन घाडगे, तालुका कृषी
अधिकारी बी.बी. वाणी यांनी घटनास्थळाला भेट देऊन ऊस जळिताचा पंचनामा केला.
आमदार शरद सोनवणे यांनी घटनास्थळाला भेट देऊन ऊस जळिताची माहिती घेऊन नुकसानभरपाईबाबत प्रशासनाला सूचना केल्या. (वार्ताहर)

Web Title: 38 acres of sugarcane khak due to the short circuit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.