वधूला उचलून नवदाम्पत्याने केल्या जेजुरी गडाच्या ३८० पायऱ्या सर...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 01:55 PM2017-12-14T13:55:43+5:302017-12-14T15:08:25+5:30
पुणे जिल्ह्यात जेजूरी येथील मार्तंड देवाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने नवदाम्पत्य जात असतात. असेच एक मांजरीतील नवदाम्पत्य जेजुरीस गेले आणि अचानक नवरीला उचलून पूर्ण जेजुरी गड पायी सर करण्याचे ठरवले.
मांजरी : लग्न झाले की दुसऱ्या दिवशी कुलदैवताच्या दर्शनासाठी नवरदेव व नवरी जात असतात. पुणे जिल्ह्यात जेजूरी येथील मार्तंड देवाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने नवदाम्पत्य जात असतात. असेच एक मांजरीतील नवदाम्पत्य जेजुरीस गेले आणि अचानक नवरीला उचलून पूर्ण जेजुरी गड पायी सर करण्याचे ठरवले.
घुले कुटुंबातील असलेली कन्या सायली व उंद्रे कुटुंबातील असलेला चिरंजीव सूरज यांचा विवाह नुकताच झाला. जेजुरी गडावर जात असताना पाच पायऱ्या नववधूला उचलून चालण्याची पूर्वीपासून प्रथा आहे. परंतु नवरदेवाने नवरीला चक्क गडाच्या संपूर्ण ३८० पायऱ्या उचलून घेऊन सर केल्या. त्यामुळे जाता येणारे भाविक या नवदाम्पत्यांकडे पाहुन कौतुक करत होते. नवरदेवाने फेसबुक व व्हॉट्सअॅप या सोशल मीडियावर पूर्ण गड पार केलेली क्लिप शेअर केली आहे.
सध्याच्या परिस्थितीत अनेक लोकांचे शरीरातील रचना स्थूलपणामुळे शरीर वाढलेले दिसते. त्यामुळे गड चढताना अनेकांना कसोटी करावी लागत आहे. अनेक लोक वेटलॉस (शरीराचे वजन कमी करण्यासाठी) डॉक्टरकडे, विविध प्रकारे आहारात डायटिंग करून संतुलित करताना दिसत आहे. एवढा गड वधूला घेऊन चढणे सोपी बाब नाही. परंतू वयाच्या विसाव्या वर्षापासून जिम्नशियमची आवड असल्याने हे त्याला शक्य झाले, असे सूरजने सांगितले. पाऊण तासात गड पार केला आणि तोही पाच दमात.
गड चढल्यानंतर नवरदेवाचे हृदयाचे ठोके वाढले होते. दहा मिनिटे जागेवर थांबून विश्रांती घेतली व त्यानंतर भंडारा उधळून देवाचे दर्शन घेऊन खाली आलो, असे सूरज व सायली यांनी सांगितले.