पुणे मनपाच्या गणेशमूर्ती तयार करण्याच्या उपक्रमात 3 हजार 82 विद्यार्थ्यांनी नोंदवला उत्स्फूर्त सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2017 01:37 PM2017-08-24T13:37:37+5:302017-08-24T13:42:03+5:30
पुणे महापालिकेनं आयोजित केलेल्या ''तुम्हीच करा, तुमची गणेशमूर्ती'' या उपक्रमात 3 हजार 82 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या उपक्रमाची गिनीज बुकमध्ये नोंद होणार आहे.
पुणे, दि. 24 - पुणे महापालिकेनं आयोजित केलेल्या ''तुम्हीच करा, तुमची गणेशमूर्ती'' या उपक्रमात 3 हजार 82 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या उपक्रमाची गिनीज बुकमध्ये नोंद होणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाचे शतकोत्तर रौप्यमहोत्सव वर्ष महापालिकेच्या वतीने साजरे करण्यात येत आहे. त्याअंतर्गत हा विक्रमी उपक्रम होत आहे. प्रसिद्ध शिल्पकार विवेक खटावकर मुलांना मार्गदर्शन करत आहे.
महापौर मुक्ता टिळक यांच्या उपस्थितीत सकाळी 10 वाजता सणस मैदानात या उपक्रमास सुरुवात झाली. सहभागी विद्यार्थ्यांना हातावर बांधण्यासाठी बँड दिला जात होता. उपक्रमात 3 हजार विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवला गेल्यानंतर सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट करुन आनंद व्यक्त केला. खटावकर यांनी स्वत: मुलांबरोबर सहभागी होत गणेशमूर्ती कशी तयार करायची याचे प्रात्यक्षिकासह माहितीही दिली.