सेवानिवृत्त शिक्षकांच्या ग्रॅच्युईटीचे ३८६ काेटी थकले; दाेन वर्षे झाले तरीही रक्कम मिळेना

By प्रशांत बिडवे | Published: December 17, 2023 05:49 PM2023-12-17T17:49:47+5:302023-12-17T17:50:10+5:30

राज्य सरकारने थकविलेल्या रकमेत पश्चिम महाराष्ट्रातील शिक्षकांचे सर्वाधिक १७४ काेटी ८८ लाख ७४ हजार रूपये एवढे देणे आहे

386 crore of gratuity of retired teachers Even after two years the amount was not received | सेवानिवृत्त शिक्षकांच्या ग्रॅच्युईटीचे ३८६ काेटी थकले; दाेन वर्षे झाले तरीही रक्कम मिळेना

सेवानिवृत्त शिक्षकांच्या ग्रॅच्युईटीचे ३८६ काेटी थकले; दाेन वर्षे झाले तरीही रक्कम मिळेना

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधून सेवानिवृत्त झालेल्या हजारो शिक्षकांचे सेवा उपदान (ग्रॅच्युईटी) व पेन्शन अंशराशीकरण रकमा राज्य शासनाकडे थकीत आहेत. प्राथमिक शिक्षकांना ग्रॅच्युईटीची ३८६ कोटी ७० लाख ९२ हजार रूपयांची रक्कम सरकारकडून येणे बाकी आहे. मागील दीड ते दोन वर्षापासून या रकमा थकीत असल्याची माहिती समोर येत आहे. 

राज्य सरकारने थकविलेल्या रकमेत पश्चिम महाराष्ट्रातील शिक्षकांचे सर्वाधिक १७४ काेटी ८८ लाख ७४ हजार रूपये एवढे देणे आहे. त्यामधील काही शिक्षकांचे तर १२ ते १४ लाखांपर्यंत रकमा थकल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्रापाठाेपाठ विदर्भ १४५ कोटी ७८ लाख ६६ हजार रूपये तर मराठवाड्यात ६६ कोटी ३ लाख ५२ हजार इतकी रक्कम दि. ३१ मे २०२३ अखेर सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना सेवाउपदान स्वरूपात सरकारने देणे बाकी आहे.

पश्चिम महाराष्ट्र
 
पुणे - २७ काेटी २६ लाख, नगर- १४ काेटी २४ लाख, नाशिक - २४ काेटी ८३ लाख, सांगली - १५ काेटी ९१ लाख, काेल्हापूर - १४ काेटी २६ लाख, सातारा - ८ काेटी ३७ लाख, साेलापूर - ६ काेटी ६५ लाख, ठाणे १० काेटी ९१ लाख, पालघर - ४ काेटी १० लाख, रायगड - १५ काेटी ९० लाख, रत्नागिरी - १० काेटी २४ लाख, सिंधुदुर्ग- ४ काेटी २१ लाख, धुळे- ३ काेटी ७८ लाख, नंदूरबार- १ काेटी ९६ लाख, जळगाव- २२ काेटी १९ लाख असे ग्रॅच्युईटीची एकुण १७४ काेटी ८८ लाख रूपये रूपये थकित आहेत.

विदर्भ

 बुलढाणा - १५ काेटी ५० लाख, अकाेला-  ७ काेटी ३५ लाख, वाशीम - काेटी २९ लाख, अमरावती - १४ काेटी ४३ लाख, यवतमाळ- २० काेटी ८६ लाख, वर्धा - ४ काेटी ९५ लाख, नागपूर- ३१ काेटी ६१ लाख, भंडारा- १७ काेटी ३३ लाख, गाेंदिया- ७ काेटी १४ लाख, चंद्रपूर १६ काेटी ४३ लाख, गडचिराेली- २ काेटी ८५ लाख असे एकुण १४५ काेटी ७८ लाख रुपये थकीत.

 मराठवाडा

 छत्रपती संभाजीनगर - ४ काेटी ७३ लाख, बीड- २० काेटी ५८ लाख, नांदेड - १५ काेटी ३८ लाख, लातूर - १२ काेटी ६४ लाख, हिंगाेली ५ काेटी २१ लाख, उस्मानाबाद ३ काेटी ९२ लाख, परभणी २ काेटी २९ लाख आणि जालना ९५ लाख असे एकुण ६६ काेटी रूपये उपदान स्वरूपात शासनाकडून येणे बाकी आहेत.

सेवानिवृत्त शिक्षकांच्या ग्रॅच्युईटीची ३८६ काेटींची रक्कम थकीत आहे. मे २०२३ नंतर राज्यात सुमारे दोन ते तीन हजार शिक्षक सेवानिवृत्त झाले असतील. या व्यतिरिक्त पेन्शन अंशराशीकरणाची व सातव्या वेतनाचे हप्ते देणे सरकारकडे बाकी आहे. - शिवानंद भरले, समन्वयक, महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघ

सेवानिवृत्त शिक्षकांची थकीत उपदान रकमेबाबत राज्यशासनाकडे मागणी केली असून शासनाने ती मंजूरही केली आहे. आम्हाला रक्कम प्राप्त हाेताच संबंधित जिल्ह्याला वितरित केली जाईल. - शरद गाेसावी, संचालक, प्राथमिक शिक्षण विभाग

Web Title: 386 crore of gratuity of retired teachers Even after two years the amount was not received

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.