निसर्ग, वनपर्यटन स्थळांच्या विकासासाठी ३९ कोटी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:12 AM2021-02-09T04:12:34+5:302021-02-09T04:12:34+5:30

इंदापूर : राज्यातील निसर्ग, तसेच वनपर्यटन स्थळांचा विकास कार्यक्रम अंतर्गत राज्यात एकूण ३९ कोटी २२ लाख रुपये खर्चाच्या नवीन, ...

39 crore sanctioned for development of nature and forest tourism | निसर्ग, वनपर्यटन स्थळांच्या विकासासाठी ३९ कोटी मंजूर

निसर्ग, वनपर्यटन स्थळांच्या विकासासाठी ३९ कोटी मंजूर

Next

इंदापूर : राज्यातील निसर्ग, तसेच वनपर्यटन स्थळांचा विकास कार्यक्रम अंतर्गत राज्यात एकूण ३९ कोटी २२ लाख रुपये खर्चाच्या नवीन, तसेच चालूबाब प्रस्तावांना मान्यता देण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम व वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

दत्तात्रय भरणे म्हणाले की, पुणे जिल्ह्यातील चार प्रस्ताव निसर्ग पर्यटन तसेच वनपर्यटन स्थळ विकास अंतर्गत नव्याने समाविष्ट करण्यात आले असून, त्यामध्ये मौजे कन्हेरी येथे वनपर्यटनविषयक माहिती उद्यान तथा वन्यप्राणी अधिवास विकास परिसर यासाठी ६ कोटी ४८ लाख रुपये, इंदापूर तालुक्यातील मौजे कडबनवाडी, गट नंबर ३६ येथील चिंकारा संरक्षण व जैव विविधता वनउद्यानासाठी ३ कोटी ४३ लाख ५ हजार रुपयांच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे.

तसेच मौजे पाचगाव पर्वती फॉरेस्ट, सर्वे नंबर १ येथील तळजाई वनउद्यानाच्या अनुक्रमे ३ कोटी ६० लाख २ हजार रुपये आणि १ कोटी ४० लाख ३५ हजार रुपयांच्या दोन प्रस्तावांनाही मान्यता देण्यात आली आहे.

नवीन प्रस्तावाअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वन्यजीव विभाग पांढरकवडा ( टिपेश्वर ) साठी ११ कोटी ३८ लाख रुपये, मौजे पोहरादेवी बायोलॉजीकल पार्कसाठी ११ कोटी १ लाख रुपये इतक्या रकमेचे नवीन प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. तर श्री महालक्ष्मी संस्थान देऊळगाव ( वडसा ) साठी ३४ लाख ६६ हजार रुपये, श्री संत मुंगसाजी महाराज समाधिस्थळ, धामणगाव देव- २६ लाख ६ हजार रुपये, नेर वनउद्यान (अरोमा पार्क) ६८ लाख ८६ हजार रुपये, जैवविविधता वन उद्यान, वडगाव ( जांब ) साठीच्या ६१ लाख ४६ हजार रुपयांच्या चालू बाब प्रस्तावांनाही मान्यता देण्यात आली असल्याचेही राज्यमंत्री भरणे यांनी सांगितले.

Web Title: 39 crore sanctioned for development of nature and forest tourism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.