अट्टल घरफोड्याकडून ४ गुन्हे उघडकीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:13 AM2021-03-25T04:13:17+5:302021-03-25T04:13:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : रेकॉर्डवरील अट्टल घरफोड्याला गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने पकडून त्याच्याकडून ४ घरफोडीचे गुन्हे उघडकीस ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : रेकॉर्डवरील अट्टल घरफोड्याला गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने पकडून त्याच्याकडून ४ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्याच्याकडून ९१ ग्रॅमचे सोन्याचे दागिने, ११० ग्रॅमचे चांदीचे दागिने, ५ हजार रुपये रोख असा ४ लाख १२ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
रोहित नानाभाऊ लंके (वय २१, रा. विश्रांतवाडी) असे या घरफोड्याचे नाव आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील घरफोड्यांचा समांतर तपास करीत असताना अंमलदार गजानन सोनुने व कादीर शेख यांना रोहित लंके हा सराईत गुन्हेगार मंगळवार पेठेतील जुना बाजार येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तपास करताना त्याने ४ घरफोडीच्या गुन्ह्यांची कबुली दिली.
रोहित लंके हा अगोदर बंद घराची पाहणी करून नंतर कडीकोयंडा तोडून घरफोडी करीत असे. गुन्हे शाखेच्या युनिट २ चे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या पथकाने ही कामगिरी केली.