चाकण बाजारात चार कोटींची उलाढाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:09 AM2021-01-04T04:09:06+5:302021-01-04T04:09:06+5:30
चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची मोठी आवक होऊनही भाव स्थिर ...
चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची मोठी आवक होऊनही भाव स्थिर राहिले. तळेगाव बटाट्याची आवक कमी होऊनही बाजारभावात घसरण झाली. भुईमूग शेंगांची आवक कमी होऊनही भाव स्थिर राहिले,लसूणाची आवक वाढून भाव स्थिर राहिले. वाटाण्याची प्रचंड आवक झाल्याने बाजारभाव कोसळले. कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, वांगी, भेंडी, कारली, काकडी,दुधी भोपळा व दोडक्याच्या आवक कमी झाल्याने बाजारभावात वाढ झाली. पालेभाज्यांच्या बाजारात मेथी, कोथिंबीर, शेपू भाजीची आवक वाढूनही भाव वधारले. जनावरांच्या बाजारात जर्शी गाय, म्हैस, बैल शेळ्यांमेंढ्यांच्या संख्येत घट झाली. एकूण उलाढाल ४ कोटी २० लाख रुपये झाली.
चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक सहा हजार क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक ३८०० क्विंटलने वाढूनही कांद्याचे भाव ३००० रुपयांवर स्थिर राहिले. तळेगाव बटाट्याची एकूण आवक १,१०० क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक १०० क्विंटलने कमी होऊनही बटाट्याच्या भावात २०० रुपयांची घसरण झाली. बटाट्याचा कमाल भाव २ हजार२०० रुपयांवरून दोन हजार रुपयांवर आला. लसणाची एकूण आवक १५ क्विंटल झाली. मागील आठवड्याच्या तुनलेत ४ क्विंटलने कमी होऊनही बाजारभावात ९,००० रुपयांवर स्थिरावले. भुईमूग शेंगांची ३ क्विंटल आवक झाली.
चाकण बाजारात हिरव्या मिरचीची एकूण आवक १४८ क्विंटल झाली.हिरव्या मिरचीला २,००० ते ४,००० रुपये असा भाव मिळाला.
शेतीमालाची एकूण आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे:
कांदा - एकूण आवक - ६००० क्विंटल. भाव क्रमांक १. ३,००० रुपये, भाव क्रमांक २. २,५०० रुपये, भाव क्रमांक ३. २,००० रुपये.
बटाटा - एकूण आवक - ११०० क्विंटल. भाव क्रमांक १. २,००० रुपये, भाव क्रमांक २. १,८०० रुपये, भाव क्रमांक ३. १,२०० रुपये.
फळभाज्या
चाकण येथील फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक डागांमध्ये व प्रती दहा किलोंसाठी डागांना मिळालेले भाव पुढीलप्रमाणे: टोमॅटो - ४३ पेट्या ( ८०० ते १,२०० रू.), कोबी - १२० पोती ( २०० ते ४०० रू. ), फ्लॉवर - १५५ पोती ( ३०० ते ६०० रु.),वांगी - २३ पोती ( २,००० ते ३,००० रु.). भेंडी - २० पोती ( २,५०० ते ३,५०० रु.),दोडका - १८ पोती ( २,००० ते ३,००० रु.). कारली - १९ डाग ( २,००० ते ३,००० रु.). दुधीभोपळा - १६ पोती ( १,००० ते १,५०० रु.),काकडी - १९ पोती ( ६०० ते १,२०० रु.). फरशी - ८ पोती ( २,००० ते ३,००० रु.). वालवड - १३ पोती ( २,००० ते ४,००० रु.). गवार - ९ पोती ( २,००० ते ४,००० रू.), ढोबळी मिरची - २० डाग ( १,००० ते २,००० रु.). चवळी - ८ पोती ( १,५००) ते २,५०० रुपये ), वाटाणा - ५३० पोती ( १,५०० ते २,५०० रुपये ), शेवगा - ५ पोती ( ६,००० ते ८,००० रुपये ), गाजर - १४० पोती ( १,००० ते १,८०० रु.).
पालेभाज्या
राजगुरूनगर येथील पालेभाज्यांच्या मुख्य बाजारात मेथीची ९० हजार जुड्यांची आवक होऊन मेथीला ५०१ ते १,३२५ रुपये प्रतीशेकडा जुड्यांना भाव मिळाला. कोथिंबिरीची १ लाख २१ हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा जुड्यांना १५१ ते ११०१ रुपये एवढा भाव मिळाला. शेपूची एकूण आवक २५ हजार जुड्या झाली असून, या जुड्यांना १०१ ते ५५० रुपये असा भाव मिळाला.
चाकण येथील पालेभाज्यांच्या मुख्य बाजारात पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व प्रतिशेकडा जुड्यांना मिळालेले भाव पुढीलप्रमाणे -
मेथी - एकूण २४ हजार ५९० जुड्या ( ५०० ते १,००० रुपये ), कोथिंबीर - एकूण ३० हजार ६५० जुड्या ( ५०० ते १,००० रुपये ), शेपू - एकूण ६ हजार ५९० जुड्या (४०० ते ६०० रुपये ), पालक - एकूण ४ हजार २१५ जुड्या ( ३०० ते ५०० रुपये ).
जनावरे
चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या ७५ जर्शी गायींपैकी ३५ गाईची विक्री झाली. ( १०,००० ते ४८,००० रुपये ), १४५ बैलांपैकी ७५ बैलांची विक्री झाली.( १०,००० ते ३५,००० रुपये ), १८५ म्हशींपैकी १५२ म्हशींची विक्री झाली. ( १०,००० ते ६५,००० रुपये ), शेळ्या-मेंढ्यांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या ८७३५ शेळ्या - मेंढ्यापैकी ७६०० मेंढ्यांची विक्री होऊन त्यांना १,५०० ते १२,००० रुपये इतका भाव मिळाला.
०३ चाकण
चाकण बाजारात सुरू असलेला वाटाण्याचा लिलाव.