घाट परिसरात ४ दिवस अतिवृष्टीचा अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:10 AM2021-07-20T04:10:18+5:302021-07-20T04:10:18+5:30

कोल्हापूर, सातारा, पुण्यात अतिवृष्टीचा इशारा लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महाराष्ट्र किनारपट्टी ते कर्नाटक किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा ...

4 days heavy rain alert in Ghat area | घाट परिसरात ४ दिवस अतिवृष्टीचा अलर्ट

घाट परिसरात ४ दिवस अतिवृष्टीचा अलर्ट

Next

कोल्हापूर, सातारा, पुण्यात अतिवृष्टीचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : महाराष्ट्र किनारपट्टी ते कर्नाटक किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला असल्याने काेकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला असून, पुढील चार दिवस कोल्हापूर, सातारा, पुण्यातील घाट परिसरात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

घाट माथ्यावर सध्या जोरदार पाऊस पडत आहे. डुंगरवाडी १००, लोणावळा, भिरा, ताम्हिणी ९०, दावडी, कोयना (पोफळी), खोपोली ७० मिमी पावसाची नोंद झाली होती.

आज दिवसभरात महाबळेश्वर येथे ६६, पुणे ५, कोल्हापूर ६, सातारा, नाशिक २ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

पुणे शहरात आज दिवसभर ढगाळ वातावरण होते. अधूनमधून पावसाची एखादी सर येत होती.

पुढील चार दिवस पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

आज सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत पुणे शिवाजीनगर येथे ५, पाषाण येथे ५ मिमी पावसाची नोंद झाली. अक्षय मेजरमेंटनुसार रात्री ८ वाजेपर्यंत कात्रज येथे १६, खडकवासला येथे २०.६, वारजे १४.२, लोणी काळभोर येथे २ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

Web Title: 4 days heavy rain alert in Ghat area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.