सारोळा येथे ४ लाख ९० हजारांची अवैध दारू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:11 AM2021-09-21T04:11:44+5:302021-09-21T04:11:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नसरापूर : गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पुणे-सातारा महामार्गालगतच्या सारोळा (ता. भोर) येथे रविवारी (दि. १९) पहाटे २.३० ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नसरापूर : गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पुणे-सातारा महामार्गालगतच्या सारोळा (ता. भोर) येथे रविवारी (दि. १९) पहाटे २.३० च्या सुमारास नसरापूर येथील राजगड पोलिसांनी गावठी दारूची वाहतूक करणारी बोलेरो जीप आणि ४० प्लॅस्टिककॅन गावठी दारूसह पकडले आहेत. पोलिसांनी मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेतला असून वाहतूक करणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले आहे.
चालक राजू लक्ष्मण जानकर (वय २२, रा. चिव्हेवाडी, ता. पुरंदर), महेंद्र राजेंद्र कुंभार (वय ३१, रा. शिरवळ, शेखमेरवाडी, ता. खंडाळा, जि. सातारा), बापू धोंडिबा कोकरे (वय ३२, कांबरे, ता. भोर) या तिघांना अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी पोलीस हवालदार जगदीश शिरसाठ यांनी फिर्याद दिली. मुंबई प्रोव्हिबिशन ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दारूची वाहतूक पुणे येथील हडपसर येथून वीरसारोळा रस्त्याने शिरवळ (जि.सातारा) गावाकडे होत होती. राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांना अवैध दारू वाहतुकीसंदर्भात पोलिसांना मिळाली. सहायक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे यांच्यासह सहायक फौजदार कृष्णा कदम, पोलीस हवालदार जगदीश शिरसाट, शिपाई योगेश राजीवडे हे पोलीस पथक रात्रीची गस्त घालत असताना सारोळा (ता. भोर)च्या हद्दीत बसस्टॉपजवळ पहाटे २.३० च्या सुमारास वीर सारोळा रस्त्यावर बोलेरो जीप थांबवत तपासणी केली असता ताडपत्रीत झाकलेले ३५ लिटरचे प्रत्येकी ४० दारूचे कॅन जप्त केले. तसेच वाहतुकीसाठी वापरलेली जीप असा ४ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
सोबत फोटो व ओळ : सारोळा (ता. भोर) येथे अवैध दारू वाहतूक करणाऱ्यांना राजगड पोलिसांनी मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे.
200921\img-20210919-wa0019.jpg~200921\img-20210919-wa0021.jpg
???? ???? ? ?? : ?????? (??.???)???? ???? ???? ?????? ??????????? ????? ????????? ???????????? ??????? ????? ???.
~???? ???? ? ?? : ?????? (??.???)???? ???? ???? ?????? ??????????? ????? ????????? ???????????? ??????? ????? ???.