जेजुरीत ४ लाख भाविकांची गर्दी, भरसोमवती अमावस्येनिमित्त भंडारा-खोबऱ्याची मुक्त हस्ते उधळण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 12:13 AM2019-02-05T00:13:21+5:302019-02-05T00:13:50+5:30

दरवर्षी पौष पौर्णिमेला राज्यभरातील भटके विमुक्त, अठरापगड जाती-जमातीमधील भाविक आपापल्या कुटुंबकबिल्यासह जेजुरीला कुलधर्म कुळाचाराचे धार्मिक कार्यक्रम करण्यासाठी येत असतात.

4 lakh devotees gather in Jejuri | जेजुरीत ४ लाख भाविकांची गर्दी, भरसोमवती अमावस्येनिमित्त भंडारा-खोबऱ्याची मुक्त हस्ते उधळण

जेजुरीत ४ लाख भाविकांची गर्दी, भरसोमवती अमावस्येनिमित्त भंडारा-खोबऱ्याची मुक्त हस्ते उधळण

googlenewsNext

जेजुरी - दरवर्षी पौष पौर्णिमेला राज्यभरातील भटके विमुक्त, अठरापगड जाती-जमातीमधील भाविक आपापल्या कुटुंबकबिल्यासह जेजुरीला कुलधर्म कुळाचाराचे धार्मिक कार्यक्रम करण्यासाठी येत असतात. यावर्षी ही पौषातील अमावस्या सोमवारी आल्याने भाविकांना एक चांगला योग आला. यामुळे भाविक मोठ्या संख्येने देवदर्शन करण्यासाठी काल रविवारपासूनच जेजुरीत येत होते.
रविवारी रात्री ११.५१ वाजता अमावस्येला प्रारंभ होत असल्याने ग्रामस्थांनी भर सोमवती अमावस्या यात्रेचा निर्णय घेतला होता. संपूर्ण दिवसभर अमावस्या असल्याने भाविक जेजुरीत मिळेल त्या वाहनाने येत होते.

दुपारी १ वाजता पेशव्यांच्या आदेशाने देवाच्या उत्सवमूर्तींचा पालखी सोहळा कºहास्नानासाठी काढण्यात आला. यावेळी देव संस्थानचे प्रमुख विश्वस्त शिवराज झगडे, विश्वस्त राजकुमार लोढा, संदीप जगताप, पंकज निकुडे, तुषार साहणे, अ‍ॅड. प्रसाद शिंदे, अ‍ॅड. अशोक सकपाळ उपस्थित होते. गडकोटातील मुख्य मंदिराला प्रदक्षिणा घालून सोहळ्याने कºहास्नानासाठी कूच केले. यावेळी देव संस्थानच्यावतीने बंदुकीच्या फैरी झाडून सलामी देण्यात आली. गडातील व गडकोटाच्या सज्जातील भाविकांनी ‘यळकोट यळकोट जय मल्हार’ तसेच ‘सदानंदाचा यळकोट’चा जयघोष करीत भंडारा-खोबºयाची मोठ्या प्रमाणावर उधळण करीत देवाला मान दिला. संपूर्ण गडकोट पिवळ्याजर्द भंडाºयात न्हाऊन निघाला होता.

तळपत्या सूर्यदेवाला साक्षी ठेवत पालखी सोहळा गडकोटातून कºहा स्नानासाठी बाहेर पडला. खांदेकरी, मानकºयांनी उत्सवमूर्तीची वजनाने खूप जड असणारी पालखी आपल्या खांद्यावर लीलया पेलत गडावरून शहरातील मुख्य नंदी चौकात आणली. तेथून ऐतिहासिक चिंचबागेतील होळकर मंदिराचा मान घेऊन जानुबाई चौकमार्गे शिवाजी चौकात सोहळा आला. तेथून कोथळे रस्त्याने सोहळ्याने कºहा नदीकडे मार्गस्थ झाला. सायंकाळी ५.३० वाजता देवाचे पुजारी, ग्रामस्थ मानकºयांनी उत्सवमूर्तीला विधिवत स्नान घातले. यावेळी नदीवर उपस्थित असलेल्या हजारो भाविकांनीही कºहास्नान उरकून यात्रेचे पुण्य मिळवले. यानंतर सोहळ्याने माघारीचे प्रस्थान ठेवले.

कोथळे, रानमळा, कोरपडवसती, दवणेमळा येथील मान स्वीकारत रात्री ७ वाजता सोहळा ग्रामदेवता जानुबाई मंदिरासमोर विसावला. येथे ग्रामस्थांनी उत्सवमूर्तीचे दर्शन घेतले. रात्री उशिरा सोहळा गडकोटावर पोहोचला.पेशव्यांनी रोजमारा वाटप करून सोहळ्याची सांगता झाली. पालखी सोहळा समितीचे अध्यक्ष गणेश आगलावे, पदाधिकारी अमोल शिंदे, बबन बयास, अरुण खोमणे, पुजारी सेवकवर्गाने सोहळ्याचे नियोजन केले.भरसोमवती यात्रा असल्याने कालपासूनच भाविक जेजुरीत देवदर्शनासाठी येत होते. वाहतुकीवर ताण येऊ नये, म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जेजुरीचे सहायक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी पोलीस कर्मचाºयांसह चोख बंदोबस्त ठेवला होता.

जत्रा-यात्रा-उत्सवांमधील भोळ्याभाबड्या भाविकांची बाहेरील व्यापाºयांकडून मोठी फसवणूक झाल्याचे या यात्रेत निदर्शनाला आले. पिवळाजर्द भंडारा म्हणून बाहेरील काही व्यापाºयांनी भेसळीचा आणि मातीमिश्रित, पिवळी पावडर (यलो पावडर) भाविकांच्या माथी मारला, मागील काही वर्षांपासून स्थानिक ग्रामस्थ, खांदेकरी, मानकरी आणि देवसंस्थान समिती याबाबत संबंधित प्रशासनाने लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येऊनदेखील दुर्लक्ष करण्यात येत आहे.

मार्तंड देवसंस्थान आणि जेजुरी पालिका प्रशासनाकडून येणाºया भाविकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी ठिकठिकाणी टँकरचे नियोजन करण्यात आले होते. एसटी महामंडळाकडूनही जादा बसेसची सोय करण्यात आली होती. भेसळयुक्त भंडाºयाची मोठ्या प्रमाणात विक्री खंडेरायाच्या धार्मिक विधींमध्ये भंडाºयाला मोठे महत्त्व आहे. भंडारा-खोबरे खरेदी करून तळीभंडार करून देवाला अर्पण करणे आणि उधळण करीत देवाच्या नावाने जयघोष केल्याशिवाय येथील विधी पूर्ण होऊच शकत नाहीत, मात्र राज्यातून येणाºया भाविकांच्या श्रद्धेचा येथे मोठा गैरफायदा घेण्याचा प्रकार होतो.

Web Title: 4 lakh devotees gather in Jejuri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.