४ लाख विद्यार्थी आज देणार ‘सीईटी’ची परीक्षा

By admin | Published: May 11, 2017 04:32 AM2017-05-11T04:32:16+5:302017-05-11T04:46:13+5:30

राज्य शासनाकडून अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी

4 lakh students today to give CET exam | ४ लाख विद्यार्थी आज देणार ‘सीईटी’ची परीक्षा

४ लाख विद्यार्थी आज देणार ‘सीईटी’ची परीक्षा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्य शासनाकडून अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी समाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) आज (गुरूवारी) पार पडणार आहे. राज्यभरातून ३ लाख ९८ हजार विद्यार्थी सीईटीची परीक्षा देणार आहेत. विद्यार्थ्यांनी ऐनवेळी होणारी गडबड टाळण्यासाठी घरातून लवकर निघून परीक्षा केंद्रावर वेळेवर पोहचावे असे आवाहन करण्यात आले आहे.
राज्य प्रवेश परीक्षा कक्षामार्फत सीईटीची परीक्षा घेतली जात आहे. पुण्यातील ९९ उपकेंद्रावरून ४४ हजार विद्यार्थी सीईटीची परीक्षा देणार आहेत. प्रत्येक पेपरसाठी दीड तासाचा कालावधी देण्यात आलेला आहे. गणित (पेपर-१), भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र (पेपर-२) आणि जीवशास्त्र (पेपर-३) या विषयांची परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षा सुरू झाल्यावर उमेदवारास परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही.

Web Title: 4 lakh students today to give CET exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.