पार्ट टाइम नोकरीच्या शाेधात महिलेला ४ लाखांचा गंडा; बाणेर परिसरातील घटना
By भाग्यश्री गिलडा | Published: October 14, 2023 04:59 PM2023-10-14T16:59:26+5:302023-10-14T16:59:50+5:30
याबाबत बाणेर परिसरात राहणाऱ्या ३३ वर्षीय महिलेने शुक्रवारी (दि. १३) फिर्याद दिली....
पुणे : पार्ट टाइम जॉब करून चांगला परतावा मिळवा, असे सांगून महिलेची फसवणूक केली. हा गुन्हा ७ जून ते १ जुलै २०२३ यादरम्यान ऑनलाइन घडला आहे. याबाबत बाणेर परिसरात राहणाऱ्या ३३ वर्षीय महिलेने शुक्रवारी (दि. १३) फिर्याद दिली.
अधिक माहितीनुसार, व्हाॅट्सॲपच्या माध्यमातून अनोळखी व्यक्तीने महिलेला संपर्क साधला. जॉबसाठी इच्छुक असल्याचे सांगितल्यावर तिला टेलिग्राम ग्रुपमध्ये ॲड केले. त्यानंतर वेगवेगळे टास्क देऊन ते पूर्ण करण्यास सांगितले. सुरुवातीला काही प्रमाणात मोबदला देऊन त्यांनतर वेगवेगळी करणे सांगून महिलेला ४ लाख ३३ हजार रुपये गुंतवण्यासाठी भाग पाडले. त्यानंतर कोणत्याही प्रकारचा परतावा न देता फसवणूक केली.
याप्रकरणी महिलेने अज्ञात मोबाइल क्रमांकधारक तसेच टेलिग्राम युजर आणि विविध बँक खातेधारक यांच्या विरोधात चतुःशृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी चतुःशृंगी ठाण्याचे पोलिस निरीक्षक अंकुश चिंतामण तपास करत आहेत.