यूजीसीकडून विद्यापीठाला ४ कोटी

By admin | Published: July 8, 2015 02:46 AM2015-07-08T02:46:27+5:302015-07-08T02:46:27+5:30

दवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना कौशल्य देऊन कुशल मनुष्यबळाची निर्मिती करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या दीनदयाळ उपाध्याय कुशल केंद्र योजनेंतर्गत

4 million from the UGC university | यूजीसीकडून विद्यापीठाला ४ कोटी

यूजीसीकडून विद्यापीठाला ४ कोटी

Next

पुणे : पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना कौशल्य देऊन कुशल मनुष्यबळाची निर्मिती करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या दीनदयाळ उपाध्याय कुशल केंद्र योजनेंतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब
आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला ४ कोटी २० लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. तसेच गरवारे महाविद्यालाही या योजनेतून २ कोटी ५० लाख रुपये निधी प्राप्त झाला आहे, असे विद्यापीठाच्या महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक डॉ.व्ही.बी. गायकवाड यांनी सांगितले.
गरवारे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गौतम भोंग म्हणाले, ‘‘या निधीचा विनियोग करून महाविद्यालयातील पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकसित केले जाईल.’’

Web Title: 4 million from the UGC university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.