पुणे रेल्वे स्थानकावरील वाढती गर्दी रोखण्यासाठी नव्याने ४ प्लॅटफॉर्म उभारले जाणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2024 01:22 PM2024-06-15T13:22:26+5:302024-06-15T13:23:06+5:30
हे प्लॅटफॉर्म मालधक्क्याच्या बाजूला असलेल्या रेल्वेच्या जागेत लवकरच वाढविले जाणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले....
पुणे :पुणेरेल्वे स्थानकावर वाढती गर्दी पाहता स्टेशनवरील प्लॅटफाॅर्म कमी पडत आहे. त्यामुळे प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून ४ नवीन प्लॅटफॉर्म वाढवण्याचे नियोजन करण्यात येत आहे. हे प्लॅटफॉर्म मालधक्क्याच्या बाजूला असलेल्या रेल्वेच्या जागेत लवकरच वाढविले जाणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
पुणे रेल्वे स्थानकावरून दररोज हजारो प्रवासी ये-जा करतात. त्यामुळे मालधक्क्याच्या बाजूला असलेल्या नव्या जागेत चार नवीन प्लॅटफॉर्म वाढवण्याचे नियोजन सुरू आहे. त्यासंदर्भातील कार्यवाही रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे. त्यामुळे आगामी काळात रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
पुणे रेल्वे स्थानकावरील वाढती गर्दी रोखण्यासाठी आणि प्रवाशांना वेळेत सेवा पुरवण्यासाठी आम्ही विविध उपाययोजना करत आहाेत. त्यात पुणे रेल्वे स्थानकावर ४ अतिरिक्त प्लॅटफॉर्म वाढवण्यात येणार आहेत. हे ४ प्लॅटफॉर्म मालधक्क्याच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत वाढविण्याचे नियोजन आहे.
- इंदू दुबे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मध्य रेल्वे, पुणे विभाग