पुण्यातील चासकमान धरणात ४ विद्यार्थ्यांचा बुडून मुत्यू; २ मुले आणि २ मुलींचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 20:28 IST2022-05-19T20:27:33+5:302022-05-19T20:28:10+5:30
धरणातील पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडुन मुत्यू झाला

पुण्यातील चासकमान धरणात ४ विद्यार्थ्यांचा बुडून मुत्यू; २ मुले आणि २ मुलींचा समावेश
राजगुरुनगर : चासकमान धरणाच्या पाण्यात चार विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून दुदैवी मुत्यु झाल्याची घटना (दि १९ ) रोजी साडेचारच्या वाजण्याच्या सुमारास गुंडाळवाडी (ता खेड घडली आहे. यामध्ये दोन मुले, दोन मुलींचा समावेश आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
चासकमान धरणालगत डोंगरावर सह्याद्री स्कुल आहे. या स्कुलचे विद्यार्थी आज दुपारी चार वाजता गुंडाळवाडी (ता खेड ) येथे चासकमान धरण परिसर क्षेत्रात आले होते. त्यांना धरणातील पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडुन मुत्यू झाला आहे. मुत्यूमुखी पडलेल्या विद्यार्थ्याची नांवे कळू शकली नाही. घटनास्थळी खेड पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक सतीश गुरव, महिला पोलीस उपनिरिक्षक वर्षा राणी घाटे व पोलिस कर्मचारी पोहोचले असुन शोध सुरू आहे. खेड तालुक्यातील गुंडाळवाडी येथील डोंगरावरील सह्याद्री स्कुल देशात प्रसिद्ध आहे.