बांधकाम कंपनीला कर्मचाऱ्याकडूनच ४० ते ४५ लाखांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:10 AM2021-05-18T04:10:23+5:302021-05-18T04:10:23+5:30

पुणे : बांधकाम क्षेत्रातील सिटी कॉपोरेशन या कंपनीला तेथील एका कर्मचाऱ्यानेच बनावट कागदपत्राद्वारे ४० ते ४५ लाख रुपयांना ...

40 to 45 lakhs from the employees of the construction company | बांधकाम कंपनीला कर्मचाऱ्याकडूनच ४० ते ४५ लाखांचा गंडा

बांधकाम कंपनीला कर्मचाऱ्याकडूनच ४० ते ४५ लाखांचा गंडा

Next

पुणे : बांधकाम क्षेत्रातील सिटी कॉपोरेशन या कंपनीला तेथील एका कर्मचाऱ्यानेच बनावट कागदपत्राद्वारे ४० ते ४५ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.

आशिष शेळके (रा. अहमदनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी सुनिल सुरेश तरटे (वय ५४, रा. बिबवेवाडी) यांनी हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

आशिष शेळके हा हडपसर येथील अमनोरामध्ये असलेल्या सिटी कॉपोरेशन लि. या कंपनीत कामाला होता. २०११ ते २०२० या कालावधीत विविध बँकांकडून कंपनीला मिळणारी कमिशनची रक्कम ही कंपनीची असताना त्याने ती कंपनीकडे जमा न करता हेतूपूर्वक मॅनेजर अतुल गोगावले यांची खोटी सही करुन बनावट कागदपत्रे तयार केली. त्याद्वारे बँकेत खाते उघडून कमिशन कोड तयार केले. तेथून कमिशनची रक्कम स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी स्वत:कडे बाळगून स्वत:साठी वापर केला. कंपनीचा विश्वासघात करुन कंपनीची अंदाजे ४० ते ४५ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक पाटील अधिक तपास करीत आहेत़

Web Title: 40 to 45 lakhs from the employees of the construction company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.