हडपसरमध्ये ४० लाखांचा दरोडा

By admin | Published: November 3, 2014 04:55 AM2014-11-03T04:55:58+5:302014-11-03T04:55:58+5:30

पिस्तुलाचा धाक दाखवून ४० लाख रुपयांचे १५०० गॅ्रम सोन्याचे दागिने तिघा चोरट्यांनी जबरदस्तीने लुटून नेले़ दुकानात तब्बल २१ कर्मचारी व ग्राहक असताना तिघांनी हा धाडसी दरोडा टाकला़

40 lakhs robbery in Hadapsar | हडपसरमध्ये ४० लाखांचा दरोडा

हडपसरमध्ये ४० लाखांचा दरोडा

Next

हडपसर : हडपसर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर रविदर्शन कॉम्पलेक्समधील सोनिगरा ज्वेलर्समध्ये आज दुपारी पिस्तुलाचा धाक दाखवून ४० लाख रुपयांचे १५०० गॅ्रम सोन्याचे दागिने तिघा चोरट्यांनी जबरदस्तीने लुटून नेले़ दुकानात तब्बल २१ कर्मचारी व ग्राहक असताना तिघांनी हा धाडसी दरोडा टाकला़ त्यांना कोणीही प्रतिकार करण्याची हिंमत दाखवू शकले नाही़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर व व सोलापूर रस्त्यावरील एसटीथांब्या लगत रविदर्शन कॉम्पलेक्समध्ये सोनिगरा ज्वेलर्स हे सोन्या-चांदीचे दुकान आहे़ गाडीतळावरील या दुकानात आज दुपारी ३ वाजून १० मिनिटांनी एक २४ वर्षांचा तरुण आला़ त्याने सोन्याचे दागिने करायचे आहेत, असे सांगून त्याने काही दागिने पाहायला सुरुवात केली़ त्या वेळी अन्य दोघे आतमध्ये आले़ त्यांनी मास्क लावला होता़
कामगारांना व ग्राहकांना पिस्तुलाचा धाक दाखवत डिस्प्ले-ट्रेमधील १५०० गॅ्रमचे सोन्याचे दागिने घेऊन त्यांनी पोबारा केला. या सोन्याची किंंमत सुमारे ४० लाख रुपये आहे. याबाबत अजित दलिचंद ओसवाल (वय ३८, रा. लालबाग सोसायटी, फ्लॅट नं. ६, मार्केटयार्ड) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात ३ चोरट्यांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. या दुकानात १६ पुरुष व ५ महिला कामगार आहेत. बंदुकधारी सुरक्षारक्षकही आहे. परंतु, आज तो आजारी असल्यामुळे सुटीवर होता. दुकानामध्ये ३० सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. सोनिगराचे पुण्यात एकून ४ सोन्या-चांदीची दुकाने आहेत. श्वान पथकाने चोरट्यांचा काही अंतरापर्यंत मार्ग काढला. तर, सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले आहे. चोरट्यांनी तोंडावर मास्क लावले होते. तर, चोरटे हिरव्या रंगाच्या मारुती ८०० ने पळून गेल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: 40 lakhs robbery in Hadapsar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.