पुणे विभागातून 'या' दोन ठिकाणी ४० विशेष रेल्वे गाड्या
By अजित घस्ते | Published: March 11, 2024 03:20 PM2024-03-11T15:20:56+5:302024-03-11T15:21:27+5:30
प्रवाशांची सोय होणार असून विशेष गाड्यांच्या लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे
पुणे : प्रवाशांची वाढती अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेकडूनपुणे विभागातून वीरांगना लक्ष्मीबाई झाशी जंक्शन आणि अजमेर या दोन ठिकाणी ४० विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांची सोय होणार आहे.
पुणे-वीरांगना लक्ष्मीबाई झाशी जंक्शन गाडी क्र.०१९२१ साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस पुण्याहून (दि. १४) मार्च ते (दि. २७) जून या कालावधीत दर गुरुवारी १५.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता वीरांगना लक्ष्मीबाई झाशी जंक्शनला पोहोचेल. तर गाडी क्र. ०१९२२ वीरांगना लक्ष्मीबाई झाशी जंक्शन-पुणे साप्ताहिक विशेष एक्सप्रेस दर बुधवारी (दि. १३) ते (दि.२६) जूनपर्यंत वीरांगना लक्ष्मीबाई झाशी जंक्शन येथून १२.५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ११.३५ वाजता पुण्याला पोहोचेल. ही गाडी दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, विदिशा, आणि ललितपूर मार्गे जाईल.
तसेच दौंड-अजमेर गाडी क्र. ०९६२६ दौंड-अजमेर साप्ताहिक विशेष एक्सप्रेस दर शुक्रवारी २३.१० वाजता दौंडहून सुटेल आणि दुसर्या दिवशी २३.४० वाजता अजमेरला पोहोचेल. तर गाडी क्र. ०९६२५ अजमेर-दौंड साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस दर गुरुवारी अजमेरहून १७.०५ वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी १८.२० वाजता दौंडला पोहोचेल. ही गाडी पुणे, लोणावळा, पनवेल, वसई रोड, बोईसर, वापी, सुरत, भरूच, वडोदरा, गोध्रा, भवानी मंडी, कोटा, सवाई माधोपूर, दुर्गापुरा, जयपूर आणि मदार जंक्शन मार्गे जाईल. या विशेष गाड्यांच्या प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.