PMC | पुणे महापालिकेच्या स्थायी समितीत ४०० कोटींच्या कामांना मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2022 11:19 AM2022-11-25T11:19:00+5:302022-11-25T11:20:13+5:30
महापालिकेत प्रशासक राज सुरू झाल्यानंतर प्रथमच स्थायी समितीच्या एका बैठकीत सुमारे ४०० कोटींच्या विविध कामांना मंजुरी मिळाली...
पुणे : शहरात प्राथमिक घनकचरा संकलन, वाहने भाडेतत्त्वावर घेण्याच्या तीन निविदा आणि सात वर्षांसाठी ७२ ब या कामासाठी ३०० कोटी रुपयांच्या निविदांना मंजुरी देण्यात आली.
पुणे-मुंबई रस्त्याचे रुंदीकरण करणे, बीआरटी मार्ग विकसित करण्यासाठी ७५ कोटी आणि बावधन बुद्रुकमध्ये समान पाणी पुरवठा योजनेंतर्गत नव्याने पाण्याची लाइन विकसित करणे यासाठी १९ कोटी रुपयांच्या निविदांना मंजुरी दिली. महापालिकेत प्रशासक राज सुरू झाल्यानंतर प्रथमच स्थायी समितीच्या एका बैठकीत सुमारे ४०० कोटींच्या विविध कामांना मंजुरी मिळाली.
आयुक्त विक्रम कुमार हे प्रशासक म्हणून काम पाहत आहेत. स्थायी समितीचे पूर्ण अधिकार प्रशासकांना आहेत. महापालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या बावधन बुद्रुक गावामध्ये नव्याने पाण्याची लाइन विकसित करण्यासाठी १९ कोटी रुपयांच्या कामाला मान्यता देण्यात आली.