दिवसभरात ४ हजार कोरोनामुक्त, १ हजार कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:12 AM2021-05-11T04:12:33+5:302021-05-11T04:12:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरात सोमवारी फेब्रुवारी महिन्यानंतर, प्रथमच सर्वांत कमी रुग्णवाढ झाली असून, ही संख्या १ हजार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरात सोमवारी फेब्रुवारी महिन्यानंतर, प्रथमच सर्वांत कमी रुग्णवाढ झाली असून, ही संख्या १ हजार १६५ इतकी आहे़ त्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सुमारे चारपट असून, आज दिवसभरात ४ हजार १० जण कोरोनामुक्त झाले आहेत़ गेल्या आठवड्यापासून कोरोनाबाधितांची संख्या कमी अन् कोरोनामुक्तांची अधिक होत असल्याने, पुणेकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
सोमवारी झालेल्या चाचण्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात घटली असून, आज दिवसभरात ११ हजार ४९९ जणांच्या तपासण्या करण्यात आल्या़ तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी १०़ १३ टक्के इतकी आहे़ तर, दिवसभरात शहरात ८३ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी २३ जण हे पुण्याबाहेरील आहेत़ शहरातील आजचा मृत्यूदर हा १़ ६५ टक्के आहे़
पुणे महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार: शहरातील विविध रुग्णालयांमध्ये सध्या ६ हजार २३६ कोरोनाबाधित रुग्ण हे ऑक्सिजनसह उपचार घेत असून, १ हजार ४०२ रुग्ण हे गंभीर आहेत़ शहरात आत्तापर्यंत २२ लाख ८७ हजार ५८७ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ४७ हजार ७२९ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ तर यापैकी ४ लाख ९ हजार ४८४ कोरोनामुक्त झाले आहेत़ तर आतापर्यंत शहरात ७ हजार ४०९ जणांचा मृत्यू झाला आहे़ शहरातील सक्रिय रुग्णसंख्या ही ३० हजार ८३६ इतकी आहे़
-----------