New Year 2024: नववर्षाच्या स्वागतासाठी पुणे शहर परिसरात ४ हजार पोलिसांचा बंदोबस्त

By नितीश गोवंडे | Published: December 30, 2023 04:46 PM2023-12-30T16:46:47+5:302023-12-30T16:47:24+5:30

शहरात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी ४ हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे....

4000 police personnel are deployed in Pune city area to welcome the new year 2024 | New Year 2024: नववर्षाच्या स्वागतासाठी पुणे शहर परिसरात ४ हजार पोलिसांचा बंदोबस्त

New Year 2024: नववर्षाच्या स्वागतासाठी पुणे शहर परिसरात ४ हजार पोलिसांचा बंदोबस्त

पुणे : सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचे स्वागत करण्यासाठी शहातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होते. यासह काही संवेदनशील भागात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पुणेपोलिसांकडून योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे. शहरात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी ४ हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

शहरातील कॅम्प परिसर, फर्ग्युसन रस्ता परिसर, विविध मॉल्स, हॉटेल्स, लॉज, ढाबे, बस, रेल्वे स्थानक, मंदीर, चर्च व धार्मिक स्थळांची तपासणी करण्यात येत आहे. यावेळी संशयित व्यक्ती आणि रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासून योग्य ती खबरदारी पुणे पोलिसांकडून घेतली जात आहे. ३१ डिसेंबर व नुतन वर्षाच्या स्वागत बंदोबस्तादरम्यान कुठेही घातपाताची घटना घडणार नाही, चेंगरा-चेंगरी होणार नाही, विशेषत: महिलांची सुरक्षितता, चैन स्नॅचिंग, पाकीटमारी सारख्या घटना घडणार नाहीत ही बंदोबस्ताची उद्दिष्ट्ये निश्चित करण्यात आली आहेत.

यासह शहरातील विविध भागांमध्ये नाकाबंदी देखील करण्यात येणार असून, वाहतूक शाखेकडून ट्रिपल सीट, ड्रंक अँड ड्राईव्ह, मॉडिफाय सायलेंसर व अन्य वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. तसेच शहरातील महत्त्वाच्या आणि गर्दीच्या ठिकाणी बॉम्ब शोधक व नाशक पथकाकडून तसेच श्वान पथकांकडून तपासणी देखील केली जणार आहे. शहरातील या भागांमध्ये जलद प्रतिसाद पथक (क्युआरटी) आणि दामिनी पथक देखील तैनात असणार आहे.

तसेच नागरिकांना होणतीही आक्षेपार्ह्य माहिती मिळाल्यास त्यांनी तात्काळ ०२०-२६१२६२९६ / ८९७५२८३१०० / ८९७५९५३१०० (व्हॉट्सअप) अथवा ११२ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन पुणे पोलिसांकडून करण्यात आले आहे.

असा असेल पोलिस बंदोबस्त..
- अपर पोलिस आयुक्त - ०२
- पोलिस उपायुक्त - ०५
- सहायक पोलिस आयुक्त - १०
- पोलिस निरीक्षक - ४०
- सहायक पोलिस निरीक्षक / उपनिरीक्षक - १५०
- पोलिस अंमलदार - २७००
- छेडछाड विरोधी पथक - ३२
- दामिनी पथक - १६

वाहतुक शाखेचा बंदोबस्त..
- पोलिस उपायुक्त - ०१
- सहायक पोलिस आयुक्त - ०३
- पोलिस निरीक्षक - १४
- सहायक पोलिस निरीक्षक / उपनिरीक्षक - ३३
- पोलिस अंमलदार - ५७०
- फिक्स पॉईंट - ३३
- डी डी पथक - २३
- पेट्रोलिंग मोबाइल - २७

Web Title: 4000 police personnel are deployed in Pune city area to welcome the new year 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.