सिग्नल तोडणे, मोबाईलवर बोलले म्हणून ४ हजार पुणेकरांचा वाहन परवाना निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:14 AM2021-09-16T04:14:03+5:302021-09-16T04:14:03+5:30
(स्टार ११६९) लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : वाहन चालविताना अनेकदा आपल्या नकळत मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन होते. वाहतूक ...
(स्टार ११६९)
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : वाहन चालविताना अनेकदा आपल्या नकळत मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन होते. वाहतूक पोलिसांनी पकडल्यानंतर दंड भरून सुटका होते, तर कधी वाहन परवाना निलंबित करण्यापर्यंतची कारवाई केली जाते. यात सिग्नल तोडणे, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, मालवाहतुकींच्या वाहनातून प्रवासी वाहतूक करणे आदी प्रकारचा गुन्हा केला तर वाहन परवाना निलंबनाची कारवाई केली जाते. मागील चार वर्षांत ४ हजार १५७ पुणेकरांचे वाहन परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
वाहन चालविताना सर्रासपणे मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन होते. मोटार वाहन कायद्याच्या कोणत्याही गुन्ह्यात वाहन परवाना निलंबित होऊ शकतो. यात सिग्नल तोडण्यापासून ते विनाहेल्मेट वाहन चालविणे या गुन्ह्याचा समावेश आहे. वाहतूक पोलीस अनेकदा जागेवरच दंड करून सोडतो. मात्र, त्यांनी जर आरटीओकडे संबंधित वाहनचालकांचा वाहन परवाना पाठविला तर त्या वाहनचालकांचा वाहन परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित होतो. त्या तीन महिन्यात संबंधित वाहनचालकाने कोणतेही वाहन चालवू नये, असा नियम आहे. मात्र त्यात जर वाहन चालविताना आढळला तर त्याचा वाहन परवाना कायमस्वरूपी निलंबित केला जाऊ शकतो. यासह अन्य काही गुन्ह्यांत वाहन परवाना कायमस्वरुपी निलंबित केला जाऊ शकतो.
बॉक्स १
चार वर्षांत झालेली कारवाई :
पुणे आरटीओने मागील चार वर्षांत ४ हजार १५७ वाहन परवाना निलंबित केले आहे. मागील चार वर्षांचा विचार करता सर्वांत जास्त कारवाई २०१९ साली झाली. चारचाकीच्या तुलनेने दुचाकीचे प्रमाण जास्त आहे.
२०१८ - १५०७
२०१९ - १९६५
२०२० - ४९०
२०२१ - १९५
बॉक्स २
बॉक्स २
हे नियम मोडल्यास परवाना निलंबित :
मोटार वाहन कायद्यानुसार वाहनाशी संबंधित प्रत्येक प्रकारच्या गुन्ह्यांत वाहन परवाना निलंबित होऊ शकतो. यात दारू पिल्यानंतर वाहन चालविणे, वेगात गाडी चालविणे, मोबाईलवर बोलत गाडी चालविणे, विना हेल्मेट वाहन चालविणे, आदी प्रकारच्या गुन्ह्याचा समावेश आहे.
बॉक्स ३
आधी तीन महिने, नंतर कायमस्वरूपी निलंबित
वाहन परवाना निलंबित झाल्यावर संबंधित वाहनधारकाने कोणत्याही प्रकारचे वाहन चालवू नये, असा नियम आहे. वाहन परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित केला जातो. निलंबनाच्या कालावधीत त्यांनी दुसरा गुन्हा केला, तर त्याचा वाहन परवाना कायमस्वरुपसाठी निलंबित केला जातो. तसेच, अन्य मोठ्या गुन्ह्यात देखील वाहन परवाना कायमस्वरूपी निलंबित केला जातो.
बॉक्स ४
अशी होते कारवाई
वाहतूक पोलिसाने जर कारवाई केली असेल तर तो वाहन परवाना स्वतः अथवा पोस्टाने आरटीओ कार्यालयाकडे पाठविला जातो. त्यात संबंधित गुन्ह्याची माहिती दिली जाते. जर ही कारवाई आरटीओने केली असेल तर त्याचा मेमो देऊन वाहन परवाना निलंबित होतो. ९० दिवस पूर्ण झाल्यावर संबंधित वाहन धारकास पुन्हा वाहन परवाना दिला जाते.
कोट १
विविध प्रकारच्या गुन्ह्यांत वाहन परवाना निलंबित केला जातो. पुणे आरटीओने मागील चार वर्षात ४१५७ वाहन परवाना निलंबित केले आहे.
- संजीव भोर, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे