तळजाई वसाहतीत ४१ दुचाकींचे सीटकव्हर फाडले, ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल; दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 12:56 AM2017-12-28T00:56:56+5:302017-12-28T00:57:08+5:30
पुणे/सहकारनगर : वारजेमधील गाड्या तोडफोडीची घटना ताजी असतानाच बुधवारी सकाळी तळजाई वसाहतीमध्ये दुचाकी व रिक्षा अशा ४१ वाहनांचे सीटकव्हर फाडण्याची घटना उघडकीस आली आहे़
पुणे/सहकारनगर : वारजेमधील गाड्या तोडफोडीची घटना ताजी असतानाच बुधवारी सकाळी तळजाई वसाहतीमध्ये दुचाकी व रिक्षा अशा ४१ वाहनांचे सीटकव्हर फाडण्याची घटना उघडकीस आली आहे़ याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी तिघा जणांना अटक केली आहे़
धनंजय गणेश आडागळे (वय १९, रा़ तळजाई वसाहत) आणि रोहित मोहन चव्हाण (वय १९, रा़ तळजाई वसाहत) या दोघांना अटक केली आहे़ त्यांचे साथीदार सूरज ऊर्फ डगºया गायकवाड, सूरज जाधव, शैलेश पवार, पप्पू आगलावे, अनिकेत आगलावे यांच्यासह एका अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना बुधवारी पहाटे चार ते साडेचार वाजेच्या दरम्यान तळजाई वसाहतीतील उकिरंडे रेशन दुकानाच्या गल्लीत एकता मित्र मंडळाजवळ घडली़ धनंजय आडागळे व त्याच्या साथीदारांनी परिसरात दहशत पसरविण्याच्या उद्देशाने पहाटे एकत्र येऊन या ठिकाणी पार्क केलेल्या ४१ दुचाकींचे सीटकव्हर; तसेच २ रिक्षांचे हूड फाडले़ गोंधळ घालत हे टोळके निघून गेल्यानंतर नागरिकांच्या लक्षात हा प्रकार आला़ या प्रकार समजताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक निकम व त्यांच्या सहकाºयांनी घटनास्थळी धाव घेतली़ तेव्हा नागरिक संतप्त झाले होते़ त्यांनी आरोपींना तातडीने पकडण्याची मागणी केली़ या वेळी तेथील २ रिक्षा जागेवर नसल्याचे दिसून आले़
पोलिसांनी तातडीने परिसरातील सीसीटीव्ही कॅमेºयांनी केलेले चित्रीकरण पडताळण्यास सुरुवात केली़ त्यात एक आरोपी रिक्षा ढकलत असल्याचे आढळून आले़ ही रिक्षा विणकर सभागृहाजवळ सापडली़ तिचा स्वीच बंद करण्यात आला होता़
गेल्या काही दिवसांत भाईगिरी करण्यासाठी व परिसरात आपली दहशत निर्माण व्हावी, यासाठी रस्त्यावर पार्क करण्यात आलेली दुचाकी व चारचाकी वाहनांना लक्ष्य करण्याचे प्रमाण वाढले आहे़ वारजे परिसरात अशा किमान ३ घटना घडल्या असून बिबवेवाडी, कर्वेनगर, बाणेर, महर्षीनगर या परिसरातही अशा घटना यापूर्वी घडल्या आहेत़
।या आधी अशा घटना परिसरात घडल्या होत्या; मात्र या वेळी याचे प्रमाण खूपच जास्त आहे. ४० पेक्षाही जास्त गाड्यांचे नुकसान करण्यात आले आहे. - दादा लोंढे,
अध्यक्ष, एकता मित्रमंडळ