MPSC | राज्य कर निरीक्षक अन् पोलीस उपनिरीक्षकची ४१९ पदे वाढली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 09:56 AM2022-04-15T09:56:43+5:302022-04-15T09:58:12+5:30
विविध विभागांकडून आलेल्या मागणी पत्रानुसार त्यात ४१९ पदांची वाढ...
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांच्या मागणीनुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२१ साठी आधी ६६६ पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध केली होती. मात्र, विविध विभागांकडून आलेल्या मागणी पत्रानुसार त्यात ४१९ पदांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता १०८५ पदांकरिता ही प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याने राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२१ मधील पदसंख्येतील वाढीसंदर्भात शुद्धीपत्र आयोगाच्या संकेतस्थळावर नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील ही सर्व पदे आहेत.
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा सुधारित पदसंख्या
* सहायक कक्ष अधिकारी- - १००
* राज्य कर निरीक्षक - ६०९
* पोलीस उपनिरीक्षक - ३७६
एकूण - १०८५