जिल्ह्यातील ४२ हजार शिक्षकांनी घेतली लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:15 AM2021-09-09T04:15:05+5:302021-09-09T04:15:05+5:30
(स्टार ११५० डमी) लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लसीकरणासाठी ५ सप्टेंबरची डेडलाईन देण्यात आली होती. ...
(स्टार ११५० डमी)
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लसीकरणासाठी ५ सप्टेंबरची डेडलाईन देण्यात आली होती. पुणे जिल्ह्यातील तेरा तालुक्यांमधील शिक्षकांचे लसीकरणाचे अहवाल आले आहेत. जिल्ह्यात शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची एकूण २२ हजार ८०२ इतकी संख्या आहे. त्यापैकी २१ हजार ७४४ जणांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे तर २० हजार ७४२ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. दोन्ही डोस घेतलेल्यांची एकूण संख्या ४२ हजार ४८६ इतकी आहे तर दोन्ही डोस न मिळालेल्यांची संख्या ३ हजार ११८ इतकी आहे.
२२ हजार ८०२ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपैकी २१ हजार ७४४ जणांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर १ हजार ५८ जणांना पहिला डोस अद्याप मिळालेला नाही. तर २० हजार ७४२ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. यामध्ये २ हजार ६० जण अद्याप दुसरा डोस घेण्याचे बाकी आहेत. पुणे जिल्ह्यातील एकूण शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या एकूण संख्येच्या तुलनेत ९५ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे, असे म्हणता येईल.
---
* जिल्ह्यातील एकूण शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी - २२,८०२
* पहिला डोस घेतलेले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी - २१,७४४
* दुसरा डोस घेतलेले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी - २०,७४२
* दोन्ही डोस घेतलेले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी - ४२,४८६
* लस न घेतलेले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी - ३,११८
----
* लस न घेतलेल्यांचे काय?
शासनाने आदेश दिल्याप्रमाणे पुणे जिल्ह्यातील शिक्षकांचे लसीकरण युद्धपातळीवर करण्यात आले आहे. जिल्ह्यात १८ हजार २४२ शिक्षक तर ४,५६० शिक्षकेतर कर्मचारी असे एकूण २२ हजार ८०२ कर्मचारी आहेत. पहिला आणि दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या जवळपास ९५ टक्क्यांच्या पुढे आहे. लसींच्या तुटवड्यामुळे पहिला आणि दुसरा डोस न मिळालेल्यांची संख्या ३ हजार ११८ इतकी आहे. येत्या दोन-तीन दिवसात त्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे, असे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.