मतदार याद्याबाबत ४२३ हरकती दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:29 AM2020-12-11T04:29:09+5:302020-12-11T04:29:09+5:30
९१ ग्रामपंचायतीच्या प्रभागरचना मतदार यादीवर प्राप्त हरकती मंडलनिहाय पुढीलप्रमाणे राजगुरुनगर ( ५५ हरकती ), आळंदी (१२७ हरकती ), ...
९१ ग्रामपंचायतीच्या प्रभागरचना मतदार यादीवर प्राप्त हरकती मंडलनिहाय पुढीलप्रमाणे राजगुरुनगर ( ५५ हरकती ), आळंदी (१२७ हरकती ), चाकण (७२ हरकती ), कडुस (३९ हरकती ), कनेरसर (८२ हरकती ), पाईट (१८ हरकती ), पिंपळगाव ( १२ हरकती ) कुडे (१८ हरकती ) अशा एकुण ४२३ हरकती अर्ज दाखल झाल्या आहेत.तालुक्यातील ९१ ग्रामपंचायतीच्या प्रभागनिहाय मतदार याद्या निश्चित करुन १ डिसेंबर रोजी मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर दि.७ डिसेंबर पर्यत हरकती मागविण्यात आल्या होत्या.या प्राप्त हरकती संबधित मंडल अधिका-यांकडे देऊन सदर हरकतीबाबत गावात जाऊन शहनिशा करण्यात येऊन हरकतदार आणि मंडलाधिकारी याबाबत आलेल्या हरकतीवर जागेवरच निराकारण करुन सोडवला जाणार आहे.