हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचे ४५ टक्के काम पूर्ण, उर्वरित कामासाठी पूर्ण सर्व सहकार्य- चंद्रकांत पाटील

By नितीन चौधरी | Published: October 5, 2023 06:08 PM2023-10-05T18:08:06+5:302023-10-05T18:10:47+5:30

पुणे विमानतळ येथे या मेट्रो मार्गाबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते...

45 percent work of Hinjewadi-Shivajinagar Metro completed, all cooperation for remaining work complete - Chandrakant Patil | हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचे ४५ टक्के काम पूर्ण, उर्वरित कामासाठी पूर्ण सर्व सहकार्य- चंद्रकांत पाटील

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचे ४५ टक्के काम पूर्ण, उर्वरित कामासाठी पूर्ण सर्व सहकार्य- चंद्रकांत पाटील

googlenewsNext

पुणे :पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) माण-हिंजवडी ते शिवाजीनगर पुणे मेट्रो मार्गिका-३ च्या प्रकल्पाचे ४५ टक्के काम पूर्ण झाले आहे. या मार्गिकेमुळे हिंजवडी परिसरातील वाहतूक समस्या सुटण्यासोबत चार लाख प्रवाशांना लाभ होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या उभारणीतील अडथळे दूर करून हा मार्ग अधिक लवकर पूर्ण होईल असे नियोजन करावे, अशी सूचना उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. त्यासाठी राज्य सरकारकडून सर्व सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी या वेळी दिले.

पुणे विमानतळ येथे या मेट्रो मार्गाबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, पुणे आयटी सीटी मेट्रो रेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आलोक कपूर, पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर उपस्थित होते. पाटील म्हणाले, “महामेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. नागरिकांना घरापासून मेट्रो स्थानकापर्यंत येण्यासाठी पीएमपीची बससेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. मेट्रो स्थानकापर्यंत पोहोचण्यास कमी वेळ लागल्यास नागरिकांचा प्रतिसाद वाढेल. त्यादृष्टीने स्थानकाजवळ वाहनतळाची सुविधा करण्यात यावी व मेट्रो सेवेला जोडणारी बससेवा प्रवाशांना उपलब्ध करून द्यावी. हा मेट्रोमार्ग सतत वाहनांची वर्दळ असणाऱ्या भागातून जात असल्याने शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतूक कोंडी दूर करण्यासही मदत होईल.”

४५ टक्के काम पूर्ण -

हा मार्ग सुमारे २४ किलोमीटर लांबीचा असून यात २३ स्थानके आहेत, त्यापैकी १६ स्थानकांचे काम सुरू आहे. प्रकल्पाचा एकूण खर्च ८ हजार ३१३ कोटी आहे. सर्वेक्षणाच्या अहवालानुसार या मार्गिकेच्या परिसरात दररोज १४ लाख नागरिक प्रवास करतात. प्रवासाचा एकूण वेळ केवळ ३५ मिनिटे असल्याने नागरिकांच्या वेळेची बचत होऊ शकेल. आतापर्यंत प्रकल्पाचे ४५ टक्के काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती कपूर यांनी यावेळी दिली.

Web Title: 45 percent work of Hinjewadi-Shivajinagar Metro completed, all cooperation for remaining work complete - Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.