पुण्यातून ४६ उमेदवार रिंगणात, शिरुरसाठी 51 अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2019 12:43 AM2019-04-05T00:43:30+5:302019-04-05T00:44:01+5:30

पुणे लोकसभा मतदार संघातून ४६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत;

46 candidates from Pune, 51 forms for Shirur lok sabha election | पुण्यातून ४६ उमेदवार रिंगणात, शिरुरसाठी 51 अर्ज

पुण्यातून ४६ उमेदवार रिंगणात, शिरुरसाठी 51 अर्ज

Next

पुणे : पुणे लोकसभा मतदार संघातून ४६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत; मात्र येत्या ५ एप्रिल रोजी अर्जांची छाननी केली जाणार असून, ८ एप्रिलपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहे. त्यांतरच पुण्यातून किती उमेदवार अंतिम लढत देणार, हे स्पष्ट होणार आहे.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार पुण्यातील निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांकडून २८ मार्चपासून ४ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आले. पहिल्या दिवसापासून अर्ज घेऊन जाणाऱ्यांची संख्या मोठी होती. त्यामुळे ७० हून अधिक उमेदवारांनी १०० पेक्षा अधिक अर्ज घेतले.

मात्र, त्यातील केवळ ४६ उमेदवारांनीच अर्ज दाखल केले आहेत. पुणे लोकसभा मतदार संघातून भारतीय जनता पक्षातर्फे गिरीश बापट, तर काँग्रेसतर्फे मोहन जोशी यांनी अर्ज दाखल केला आहे. त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारासह विविध पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज जमा केले आहेत.

शिरूरसाठी ५१ अर्ज
शिरूर लोकसभा मतदार संघाची निवडणूक प्रक्रिया २ एप्रिलपासून सुरू झाली असून, आत्तापर्यंत २८ व्यक्तींनी एकूण ५१ अर्ज घेतले आहेत. त्यातील चिंचवड येथील अण्णासाहेब मगर नगर परिसरातील वहिदा शेख आणि शिरूर तालुक्यातील इनामगाव येथील हनुमानवाडीचे बाळासाहेब घाडगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

Web Title: 46 candidates from Pune, 51 forms for Shirur lok sabha election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे